शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

गोवेली रुग्णालयातील समस्यांची पाहणी; जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवारांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 17:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे.

- उमेश जाधव

टिटवाळा-: गेल्या काही महिन्यांपासून गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. एका महिन्यानंतर औषधे येतील तेव्हा या, किंवा बाहेरून औषधे विकत घ्या असे गोवेली ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी रुग्णांना सांगत आहेत. तसेच याठिकाणी अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. याबाबतचे वृत्त लोकमत वृत्त पत्रात "गोवेली ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा" या सदरा खाली वृत्त प्रसिद्ध होताच, याची दखल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेत रुग्णालयाची बुधवारी पहाणी केली. येथील औषधांचा तुटवड्याबाबत चर्चा करत औषधे पुरविण्यासंदर्भात सिव्हील सर्जन कैलास पवार यांना सांगितले.

कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयात अगोदरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जे आगोजागी घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी नादुरुस्ती व सुरक्षेचा प्रश्न अशा अनेक सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा देखील जाणवू लागल्याने रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा लाभ तालुक्याच्या ग्रामीण भागातील ६८ व दहा ते बारा पाडे नागरिक, तसेच कल्याण- मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या घटनेतील रुग्ण देखील याच गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जातात. परंतु या रुग्णालयाचा कारभार म्हणजे 'रोजचे मरे त्याला कोण रडे' असा झाला असून, सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक व रुग्ण करत आहेत.या ग्रामीण रुग्णालयात गेली काही महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांतून नाराजीचा सूर निघत आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असता, याची दखल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी घेत बुधवारी दुपारी गोवेली ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी येथे पाण्याची समस्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा विभागाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. तसेच येथील स्वच्छता व डागडुजी करण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कल्याण यांना देखील सूचना केल्या आहेत.गोवेली ग्रामीण रुग्णालयातील औषधांचा तुटवडा व येथील सुरक्षा या संदर्भात सिव्हिल सर्जन कैलास पवार यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधत सदर समस्या लवकरात लवकर दूर करण्यासंदर्भात चर्चा केली. पवार यांनी लवकरात लवकर गोवेली ग्रामीण रूग्णालयात औषधांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल तसेच सुरक्षा रक्षकां संदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. असे सुभाष पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या रेखा कंठे, जयश्री सासे, कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेंभे, डाॅ. योगेश कापूसकर, रवी टेंभे, रूग्णालय समीती सदस्य गणेश चोरगे आदी उपस्थित होते.