शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

युवराज थेटले ठरला वर्षा मॅरेथॉनचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:29 IST

बाळकुम ते ढोकाळी व कोलशेत या मार्गावर रविवारी पार पडलेल्या यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य १० किमीची मुलांच्या गटातील स्पर्धा युवराज थेटले, तर मुलींची स्पर्धा श्रीदेवी मेहेत्रे यांनी जिंकली.

ठाणे - बाळकुम ते ढोकाळी व कोलशेत या मार्गावर रविवारी पार पडलेल्या यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य १० किमीची मुलांच्या गटातील स्पर्धा युवराज थेटले, तर मुलींची स्पर्धा श्रीदेवी मेहेत्रे यांनी जिंकली. यावेळी सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील पूरग्रस्तांना आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे एक लाख एक हजार ११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दिला.युनायटेड थ्री स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ठाणे अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेला रोटरी क्लब आॅफ ठाणे अरबेनिया आणि लायन्स क्लब ठाणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी ज्येष्ठ मराठी सिनेकलाकारांनी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते. यू थ्री स्पोर्ट्स क्लबने ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्यही करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक भूषण भोईर उपस्थित होते. तीन गटांत ही स्पर्धा पार पडली. पहिला गट १० किमी, दुसरा गट पाच किमी आणि तिसरा गट तीन किमी अंतरासाठी रन फॉर फन असा होता. त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठी एक किमी अंतरासाठी मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यातूनही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.विजेत्यांची नावे१० किमी मुले- प्रथम युवराज थेटले, द्वितीय दिनेश म्हात्रे, तृतीय सागर म्हसकर१० किमी मुली - प्रथम श्रीदेवी मेहेत्रे, द्वितीय अक्षया जाडयार, तृतीय जयश्री भुयाद्रे३ किमी महिला - प्रथम गायत्री शिंदे, द्वितीय निकिता माने, तृतीय कृतिका यादव३ किमी मुले - प्रथम शैलेंश बेंद्रे, द्वितीय विशाल जाधव, तृतीय सुशांत कुमारपुरु ष गटात- प्रथम तुषार, द्वितीय दिवाकर शर्मा, तृतीय नंदकिशोर सिंगमहिला गटात - प्रथम वैशाली गर्गे, द्वितीय लक्ष्मी झा, तृतीय नेहा मुलगुंड

टॅग्स :thaneठाणे