शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

युवा सेनेचा राज्यस्तरीय युवा मेळावा ठाण्यात

By अजित मांडके | Updated: February 22, 2024 17:45 IST

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर युवासेनेचे कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकार्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

ठाणे : येत्या २४ फेब्रुवारीला ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला  आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर युवासेनेचे कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकार्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याचे शहरभर बॅनर ही लागले आहेत.

शनिवारी २४ फेब्रुवारी ला सायंकाळी ४ वाजता ठाणे शहरात युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील वर्तकनगर येथील रेमंड कपंनीच्या मैदानात हा  मेळावा  आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याची  शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.याकरिता शहरभर होल्डिंगज आणि बॅनर ही झळकले आहेत. या होल्डिंगजच्या च्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना ही डिवचण्यात आले आहे. ठाणे काय वरळीतून लढून जिंकून दाखवू असा त्यावर उल्लेख आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहे. मेळाव्याच्या शेवटच्या टप्प्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला राज्यभरातील युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकते सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ठाकरे गटाला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.तसेच यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार योगेश कदम, आणि नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांचेही युवा मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे.

या मेळाव्याच्या निमित्ताने प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आणि कसोटीपट्टू अजिंक्य रहाणे यांना शिवगौरव पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने नुकताच संसदरत्नपुरस्कार मिळालेले कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे प्रकट मुलाखत गायक संगीतकार अवधूत गुप्ते हे घेणार आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना