शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक, उल्हासनगरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 14:13 IST

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले.

उल्हासनगर- परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले.उल्हासनगर कॅम्प नं-२ गोलमैदान परिसरात मनिष कुकरेजा कुटुंबासह राहतो. पवई चौक परिसरात राहणा-या दिनेश शर्मा यांने मनिष यांना ऑफिसमध्ये बोलावून, परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मेडिकल व कागदपत्र पाठविण्यास सांगून २५ हजार रूपयाची फि घेतली. वेस्ट इंडिज येथील सेंट किड्स येथे दरमहा ५०० डॉलरची नोकरी मिळाल्याचे सांगून, वर्क परमिट व व्हिजा काढून जून २०१६ रोजी पाठविले. मनिष कुकरेजा यांने सेंट किड्स येथे जुन २०१६ ते २०१७ पर्यंत काम केले. सुरूवातीला पहिल्या महिन्याचा पगार दिल्यानंतर, इतर महिन्याचा पगार दिला नाही. याविरोधात मनिष यांनी तेथील हाय कमिशन इंडिया मध्ये तक्रार केली. त्यानंतर २६९९ डॉलरचा चेक देण्यात आला.

मनिष कुकरेजा यांना चेक देण्यात आल्यावर, तेथिल लेबर विभागाने येथे काम करता येणार नाही. तुम्हाला भारतात जावे लागेल, असे स्पष्ट सांगितले. मार्च २०१७ रोजी भारतात परत आल्यावर, आपली फसवणूक झाल्याचे मनिष कुकरेजा यांच्या लक्षात आले. नोकरीचे आमिष दाखविणा-या दिेनेश शर्मा यांच्याकडे नोकरीसाठी परदेशात पाठविण्याचा कोणताही परवाना नाही. पैश्यासाठी नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक करत असल्याचे समजले. अखेर मनिष कुकरेजा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेवून दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दिनेश शर्मा यांची चौकशी करून, पुढील कारवाईचे संकेत मध्यवर्ती पोलिसांनी दिले.