शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी झाला "आपला माणूस"  मोहिमेचा शुभारंभ; वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:12 IST

या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर बाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्य्क वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 

ठाणे: वुई आर फॉर यु आणि नौपाडा युथ यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला माणूस या मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर बाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्य्क वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 

करोना काळात गेल्या दीड दोन वर्षात स्मशानभूमीतील सर्वच बांधवांनी जीवावरचे संकट असून न डगमगता आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यांच्या या कर्तव्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून' आपला माणूस' मोहिमेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे किट जवाहरभाग स्मशान भूमीतील बांधवांना वुई आर फॉर यू आणि नौपाडा यूथच्या वतीने देण्यात आले. 

यावेळी वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली वुई आर फॉर यूचे सेवेकरी विजय डावरे, महेश सुतार, ऋषिकेश केदार, अशोक कदम, रघुनाथ रसाळ, पांडुरंग पाटील, नौपाडा युथ चे गजानन परब, अक्षय जोशी, आदित्य जाधव, अभिजित जाधव, अद्वैत मुळे आदी सहभागी झाले होते. 

माणूस मरण पावल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार झाले की त्याला मुक्ती मिळते, असे बोलले जाते. त्यासाठी अनेक मंडळीही रात्रंदिवस बॉर्डरवरील सैनिकांसारखेच स्मशानभूमीत कार्यरत असतात. या मंडळींनी कोरोना काळात ऍम्ब्युलन्स चालक, मृतदेह रॅप करणे, अग्निसंस्कार करणे, अस्थी व्यवस्थित ठेवणे यासारखी विविध कामे चोखपणे केली.  हे काम करण्यासाठी खूप मोठे जिगर लागते. त्यामुळे वुई आर फॉर यू आणि नौपाडा युथच्या माध्यमातून  ७५ वा स्वातंत्र्यदिन 'जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून  खारीचा वाटा उचलण्यात आला. ''ही मंडळी खूप मनापासून आपले कर्तव्य बजावत असतात . कुणाच्या आईसाठी, कुणाच्या वडिलांसाठी ही सर्व मंडळी सतत कार्यरत असतात. खरेतर ही मदत नाही. हे कर्तव्य आहे. भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत'', अशा भावना या वेळी वुई आर फॉर यूचे अध्यक्ष किरण नाकती यांनी व्यक्त केली.

वुई आर फॉर यू संस्थेच्या 'आपला माणूस' या मोहिमेअंतर्गत समाजातील दुर्लक्षित परंतू समाजकार्य करणाऱ्या घटकांना सहकार्य केले जाणार आहे. त्याची सुरुवात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून करण्यात आली. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणे