शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार; पाेलिस हवालदाराला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 29, 2024 20:56 IST

ठाणेनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा: बाहेर फिरण्याच्या बहाण्याने केले अत्याचार

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वाचनालयात झालेल्या मैत्रीच्या बहाण्याने वेगवेगळया ठिकाणी फिरण्यास नेत कळव्यातील एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर २८ वर्षीय अजय मोरे या माेटर परिवहन विभागातील चालक पाेलिसाला अटक केल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी सखाेल चाैकशी करण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

अजय मोरे हा खारेगावात वास्तव्याला असून मुळचा ताे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ताे कळव्यातील जवाहरबाग वाचनालयात अभ्यासाकरिता जात होता. त्याच ठिकाणी या २० वर्षीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर बाहेर फिरण्याच्या बहाण्याने अजयने तिला १० डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत जांभळी नाका येथील एका लाॅजवर तसेच खारेगाव कळवा या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने ठाणेनगर पोलिस ठाण्यात २७ फेब्रुवारी २०२४ राेजी दाखल केली. तिच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून २८ फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. ठाणे नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.खात्यांतर्गतही हाेणार चाैकशी-

ठाणे शहर पाेलिसांच्या माेटर परिवहन विभागागात (एमटी)माेरे अमलदार पदावर कार्यरत आहे. ताे १८ फेब्रुवारी २०२४ पासून डयूटीवर गैरहजर असल्याची माहिती एमटीच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याची या प्रकरणातही आता खात्यांतर्गत चाैकशी केली जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी