लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नौपाडयातील सम्राट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १९ मध्ये गुरु वारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये मोहित मनोहर जयपाल (२२) हा चित्रकार तरु ण ७५ टक्के होरपळून जखमी झाला. त्याच्यावर ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.ही सदनिका रजनी मिसळ यांची असून ती त्यांनी मनोहर जयपाल यांना भाडे तत्वावर दिली आहे. दुपारी मोहित हा एका कागदावर चित्र रंगवित होता. तिथे जवळच थिनर, मेणबत्ती अशी सामुग्रीही होती. त्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. एक फायर इंजिन आणि एका रेस्क्यू वाहनाच्या मदतीने तासाभराच्या अंतराने ही आग आटोक्यात आणण्यात या पथकांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याच्या नौपाडयातील आगीमध्ये चित्रकार तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:29 IST
नौपाडयातील सम्राट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १९ मध्ये गुरु वारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये मोहित मनोहर जयपाल (२२) हा चित्रकार तरु ण ७५ टक्के होरपळून जखमी झाला. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.
ठाण्याच्या नौपाडयातील आगीमध्ये चित्रकार तरुण गंभीर जखमी
ठळक मुद्दे ऐरोलीतील रुग्णालयात उपचार सुरु