शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांच्या टोर्इंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याची तरूणाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या कंत्राटी टोर्इंग व्हॅनवरील एका कर्मचाºयाने नो पार्र्किं गमधील महेंद्र माने या ...

ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश झटापटीमध्ये मार लागल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलिसांच्या कंत्राटी टोर्इंग व्हॅनवरील एका कर्मचाºयाने नो पार्र्किं गमधील महेंद्र माने या दुचाकी चालकाशी हुज्जत घालून त्याला धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उथळसर भागात घडली. याप्रकरणी राबोडी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील रहिवाशी माने हे एका अन्न पदार्थ घरपोच करणाºया कंपनीत नोकरीला आहेत. शुक्र वारी दुपारी त्यांनी उथळसर येथील एका उपहारगृहाच्या समोर त्यांची दुचाकी उभी केली. त्यानंतर ते उपहारगृहात अन्न पदार्थ घेण्यासाठी गेले. त्याचदरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेची टोर्इंग व्हॅन त्याठिकाणी आली. नो पार्र्किं ग मध्ये असलेली माने यांची दुचाकी टोर्इंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलून व्हॅनवर ठेवत असतांनाच तिथे ते पोहचले. त्यांनी या कारवाईला विरोध करीत त्यांची दुचाकी खाली खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोर्इंग व्हॅनवरील एका कर्मचाºयाने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. हा प्रकार घडला तेव्हा वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारीही व्हॅनमध्ये होता. त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला नाही. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते. मात्र, या वाहतूक पोलिसांकडून अशी कोणतीही उद्घोषणा झाली नसल्याचा आरोपही माने यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांचीही एकमेकांविरुद्ध तक्रार असल्यामुळे माने यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. मात्र, संबंधित तरुणाला कोणतीही मारहाण झाली नसून त्याने गाडी खेचतांना त्याला मार लागल्याचा दावा या व्हॅनवरील टोर्इंग कर्मचाºयाने केला आहे. 

‘‘ नेमकी काय घडले? याबाबतची चौकशी करण्याचे आदेश राबोडी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. यामध्ये दोषी आढळणाºयांवर कारवाई करण्यात येईल.’’

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर 

‘‘ दुचाकी नो पार्र्किं गच्या ठिकाणावरुन उचलताना उद्घोषणाही टोर्इंग व्हॅनवरील पोलीस कर्मचाºयाने केली नव्हती. दुचाकी ठेवली टोर्इंगच्या व्हॅनवर ठेवली जात असतांनाच कारवाईला विरोध केला. मात्र व्हॅनवरील कर्मचाºयाने न जुमानता गाडी खेचण्याचा प्रयत्न केल्याने झटापटीतत माझ्या हाताला मार लागला.’’महेंद्र माने, धक्काबुक्की झालेला तरूण

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस