शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही, या असल्या घाणेरड्या पाणीपुऱ्या तर खात नाही ना? जमिनीवर पीठ मळून, कामगार लाटत होते पुऱ्या

By धीरज परब | Updated: December 2, 2023 08:32 IST

Pani Puri : जमिनीवरच पीठ मळून त्याचे गोळे केले जात होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुट्ट अवस्थेतील कढई व सभोवताली घाणेरड्या अवस्थेतील भांडे होते. गाळ्यात सर्वत्र घाण होतीच शिवाय बाहेर उघडे गटार होते.

- धीरज परबमीरा रोड  - जमिनीवरच पीठ मळून त्याचे गोळे केले जात होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुट्ट अवस्थेतील कढई व सभोवताली घाणेरड्या अवस्थेतील भांडे होते. गाळ्यात सर्वत्र घाण होतीच शिवाय बाहेर उघडे गटार होते. कोणतीही स्वच्छता न ठेवता फक्त अंडरवेअरवरच कामगार  पाणीपुरीच्या पुऱ्या बनवत असल्याचा कारखाना भाईंदरमध्ये उघडकीस आला. मनसेने त्याचा व्हिडीओ समोर आणल्यावर एफडीए अधिकाऱ्यांनी धाव घेत कारवाई सुरु केली आहे.

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागात गलिच्छ ठिकाणी एका गाळ्यात पाणीपुरीची पुरी बनवणारा कारखाना चालवला जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच्या आधारे मनसेचे सचिन पोपळे, अभिनंदन चव्हाण, रॉबर्ट डिसोझा, संकेत आर्डे, साहिल उघडे आदी दोन दिवस या कारखान्याचा शोध घेत होते.  आझादनगरच्या गल्ली क्र. २, दशरथ नगर भागात अखेर तो पाणीपुरीचा कारखाना सापडला. तेथे ६ कामगार होते. सोबतची छायाचित्रे पुरेशी बोलकी आहेत. 

आरोग्याशी खेळसचिन पोपळे यांनी अन्न व औषध प्रशासन आणि नवघर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिकाऱ्यांनी येऊन तपासणी व पंचनामा केला. अतिशय गलिच्छ अवस्थेत परप्रांतीय कामगार पुऱ्या बनवत असून लोकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. या कारखान्यास अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे पोपळे यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नmira roadमीरा रोड