शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर तुम्हीच वाढवला ना? - राणे

By admin | Updated: January 26, 2017 03:12 IST

शिवसेना आणि भाजपाने २२ वर्षांत एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नाही. तसेच शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात मालमत्ताकर कमी करू,

ठाणे : शिवसेना आणि भाजपाने २२ वर्षांत एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नाही. तसेच शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात मालमत्ताकर कमी करू, असे आश्वासन दिले असतानाही तो कोणी वाढवला, असा सवाल करून तो तुम्हीच वाढवला ना, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला केला आहे.सत्तांतर झाल्याशिवाय मुंबईत दर्जेदार नागरी सुविधा मिळणार नाहीत. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर मुंबई जागतिक कीर्तीचे शहर बनवू, असे प्रतिपादन त्यांनी ठाण्यात केले. या वेळी शिवसेना आणि भाजपा सत्ता जावी आणि आघाडीची सत्ता यावी, अशी काँग्रेसची रणनीती असून ‘फसवणूक म्हणजे भाजपा’ हे आमचे घोषवाक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या भाजपाच्या कार्यालयात भरतीचा बोर्ड लावला आहे. तेथे भरती चालू आहे. कोणत्याही प्रकारच्या माणसांना तेथे प्राधान्य दिले जात आहे. जाणारी व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थ, पद आणि पैशांसाठी जात आहे. बाहेरचे लोक भाजपात एवढे येत आहेत, त्यामुळे मुळात त्यांच्याकडे होते तरी काय, असा सवाल त्यांनी केला. स्वत:चे काही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या, स्वभावाच्या, चारित्र्य नसलेल्या माणसांना भाजपात प्रवेश मिळतो आहे. त्यांची ध्येयधोरणे ही जनहिताची नसून राजकारणात स्वार्थ साधणारी आहेत. हे लोकांना आता कळून चुकले आहे. या सर्व कृतीमुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचेही ते म्हणाले.सेना आणि भाजपाकडून मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांत २२ वर्षांत काय योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये एकतरी वैशिष्टपूर्ण आहे का, असा प्रश्न करून जाहीरनामा व वचननाम्यात काही नसल्याचे सांगताना मुंबईत दुर्गंधी, रोगराई भयंकर वाढली आहे. या २२ वर्षांत शिवसेनेने मुंबई बकाल केली आहे. त्यामुळे सत्तांतर झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.