शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सत्कार की कारवाई तुम्ही ठरवा; मुख्यमंत्र्यांचा ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:11 IST

वर्तकनगर, पोखरण रोड क्रमांक-१ येथील कानवूड जंक्शन, पवारनगर आणि टिकुजीनीवाडी ते निळकंठ रस्ता तसेच बटाटा कंपनी, मानपाडा आणि कोरम मॉल मागील नाला आदी ठिकाणच्या नाल्यांची आणि रस्त्यांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्यात ठाण्यातील ज्या प्रभागात रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, लोकांची गैरसोय होणार नाही, अशा प्रभागातील अधिकाऱ्यांचा आपण सत्कार करू, मात्र जिथे दिरंगाई आणि निष्काळजीपणा आढळेल, तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिला. ठाण्यातील रस्त्यांच्या तसेच नालेसफाईच्या कामांची पाहणी करीत असताना टिकुजिनी वाडी येथे डांबरीकरणाचे काम सुरू असताना कामगारांना सुरक्षा साधने न पुरविणाऱ्या कंत्राटदाराला शिंदे यांनी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली. 

वर्तकनगर, पोखरण रोड क्रमांक-१ येथील कानवूड जंक्शन, पवारनगर आणि टिकुजीनीवाडी ते निळकंठ रस्ता तसेच बटाटा कंपनी, मानपाडा आणि कोरम मॉल मागील नाला आदी ठिकाणच्या नाल्यांची आणि रस्त्यांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनविणारे कामगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी कंत्राटदाराला खडसावले. पोखरण रोड क्रमांक २ च्या रखडलेल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. वर्क ऑर्डर देऊनही रस्त्यांचे काम वेळेत न झाल्याने मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले.

कामांचा घेतला आढावा    या पाहणी दाैऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेत असून रस्ते, पदपथ आणि नालेसफाईच्या कामांचा यात समावेश आहे.     १३४ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे केली जात असून यात काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि यूटीडब्ल्यूटीद्वारेही चांगल्या दर्जाची कामे हाेत आहेत. आयआयटीला रस्त्यांच्या कामांचे नमुने पाठविले जाणार असून थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे.    एका खड्ड्याला एक लाखांचा  दंड ठेकेदाराला भरावा लागणार आहे. त्यामुळे चांगल्या कामांवर ठेकेदारांचा भर आहे. नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास सामान्य नागरिकांना नको, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

क्लस्टरमुळे चांगल्या दर्जाची घरेक्लस्टरचे काम सर्वसामांन्यासाठी सुरू आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची घरे मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा टोला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. म्हाडा उत्तम काम करीत असल्यामुळे म्हाडाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले. या पाहणी दौऱ्यात पालिका आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांचा समावेश होता.

विकासकामांसाठी दिले ६०० कोटीकोरोना काळात महापालिकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ६०० कोटी दिले आहेत. या निधीमधून शहरात चांगली कामे होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सांगितले. ठाणेकरांच्या सुविधेकरिता रस्त्यांच्या कामावर भर दिल्याचे ते म्हणाले.

पाहणी दाैऱ्यात जेसीबी, पोकलेनने दिला दगा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नालेसफाई दौराच्या आधीच भीमनगर येतील नाल्यात पोकलेनचा अपघात झाला. नालेसफाई सुरू असताना पोकलेन नाल्यात रुतून उलटला. त्यामुळे ऐनवेळी शिंदे यांच्या दाैऱ्याचे ठिकाण बदलले. महापालिका अधिकाऱ्यांनी भीमनगर  नाल्याच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. त्यामुळे भीमनगरच्या ऐवजी पोखरण दोन नंबर येथून दाैऱ्याला सुरुवात झाली. दुसऱ्या एका नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या जेसीबीचा टायर पंक्चर झाल्याने नालेसफाईत अडथळा निर्माण होत असल्याचे उघड झाले.