शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

म्हसाच्या यात्रेवर यंदा मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:07 IST

व्यापाऱ्यांमध्ये चिंता; पाच दिवसात तीस टक्केच विक्री, यापुढे गर्दी वाढण्याची शक्यता

मुरबाड : महाराष्ट्रातील प्रसिध्द खांबलिंगेश्वर देवस्थान म्हसोबा यात्रेचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. बुधवार वगळता चार दिवस यात्रेला भाविकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आंध्रप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात येथील अनेक व्यापारी ब्लँकेट, चादरी, घोंगडी, संसारपयोगी भांड्यांची दुकाने थाटली आहेत. मात्र दरवर्षीपेक्षा ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने अवघी तीस टक्के विक्री झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. उर्वरित काळात तरी भाविक येतील अशी आशा व्यापाºयांना आहे.खांबलिंगेश्वर देवाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. यात्रेतील भाविकांना पुरेशा सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते. खांबलिंगेश्वराचे दर्शन भक्तांना व्यवस्थित व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती कडून विशेष काळजी घेतली जाते. म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी व घोंगडी, चादर, ब्लँकेट, सतरंजी, बेडशीट यासह भांडी, कोयते, कुºहाड, विळा, पळी , झारा, कालथी, पायली, शेर, पावशेर तसेच प्लास्टिकची बादली, टफ, घमेली, स्टूल , यासह प्रसाद म्हणून लाह्या, पेढे, साखरफुटाणे, बत्ताशे, कंदीपेढे या वस्तूंची विक्री यात्रेत होते.मौत का कुआ, आगगाडी, आकाशपाळणे असे मनोरंजनाचे खेळ यात्रेत आले आहेत. बुधवार व शुक्र वार वगळता गर्दी कमी राहिल्याने विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांची चार दिवसात जेमतेम तीस टक्केच विक्री झाल्याने अनेक व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे घरगुती गॅस धारकांना सिलिंडर मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र यात्रेत मिठाई तयार करणारे व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर वापरत आहेत.बंदोबस्ताचा आढावाशुक्रवारी यात्रेचा पाचवा दिवस असल्याने ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्यासह म्हसा येथे भेट देऊन बंदोबस्ताची माहिती घेतली.यावेळी त्यांनी यात्रेत कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी भाविकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे अवाहन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.म्हसा यात्रेत कोयते, गुºहाळी, विळे, पायली आदी साहित्य विक्र ीला आणले आहे. मात्र जेमतेम विक्र ी झाली आहे. जागेचे भाडेही वसूल झालेले नाही.- शोभा पवार, विक्रेतेदोन लाखाची खेळणी व इतर साहित्य विक्र ीसाठी आणले आहे. मात्र पाच दिवसात वीस हजाराची विक्र ी झाली आहे .- सद्दाम हुसेन, विक्रेतेदहा बंडल ब्लँकेट, चादर, सतरंजी विक्र ीसाठी आणले आहे. मात्र पाच दिवसात चार बंडलची विक्र ी झाली आहे. दरवर्षी पेक्षा अतिशय कमी विक्री झाली आहे.- रु पसिंग बंजारा, विक्रेतेदोन लाख रु पयांचे ब्लँकेट, चादर, सतरंजी व इतर कपडे विक्रीसाठी आणले. मात्र पाच दिवसात ४० हजाराची विक्र ी झाली आहे.- सलमान, विक्रेतेदोन लाखाचे पोळपाट, लाटणे, रवी, काठवळ, धोपाटणे विक्रीला आणले आहे. मात्र पाच दिवसात ५० हजाराची विक्र ी झाली आहे.- नसीर तांबोळी, विक्रेते

टॅग्स :murbadमुरबाड