शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराने रंगला यंदाचा बालमहोत्सव, सिन्गल शाळेतील मुलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:51 IST

ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहालय संस्थेच्या संचालिका आॅलिव्हिया डिसुझा यांना फिनिक्स पुरस्काराने गौरविण्यात आले.           प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ...

ठळक मुद्देयंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगलादिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभागसागर कारंडे यांनी साधला मनमोकळे पणाने संवाद

ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहालय संस्थेच्या संचालिका आॅलिव्हिया डिसुझा यांना फिनिक्स पुरस्काराने गौरविण्यात आले.           प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणे आयोजित हा महोत्सव सकाळपासून आयोजित करण्यात आला होता. सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संतवाणी या सांगितीक कार्यक्र माने या महोत्सवाची सुरूवात झाली. या कार्यक्रमातून संतपरंपरा उलगडण्याचा प्रयत्न बालवारकºयांकडून केला गेला. या बालमहोत्सवात यंदा प्रथमच दिव्यांग तसेच विशेष मुलांचे कलाविष्कार सादर झाले. या दिव्यांग मुलांच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास पाहण्याची संधी बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही यानिमित्ताने अनुभविण्यास मिळाली. यावेळी लहान मुलांसाठी काम करणाºया व्यक्तींचा गौरव करण्यात आला. प्रारंभ कला अकॅडमीचे विद्यार्थी ‘जाईच्या कळ््या’ हे डोंबाºयांचा जीवनपट उलगडणारे नाटक देखील यावेळी सादर झाले. सिग्नल शाळा, स्नेहालय या संस्थांचे बालकलाकारही मंचावर विविध कलाविष्कार सादर केले. व्हॅर्न्टोलॉजिस्ट सुचित्रा इंदुलकर यांच्या पपेट शोने मुलांना पोट धरुन हसविले. त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील बाल रु ग्णांसह मंचावर आगळावेगळा प्रयोग सादर केला. उपस्थितांशी सागर कारंडे यांनी मनमोकळे पणाने संवाद साधला. विशेष मुलांना उद्देशून ते म्हणाले की, आज खुप दिवसांनी माणसात आल्यासारखे वाटत आहे. बाहेरच्या जगातील माणसं ही आपल्याला अ‍ॅबनॉर्मल म्हणतात. पण या अ‍ॅबनॉर्मलाचा तुम्ही अभिमान बाळगा कारण तुम्ही त्यांच्यासारखे वाईट नाही. तुमच्या पद्धतीने जगा अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पितांबरीचे सीईओ अजय जोशी, सिंघानिया स्कूलच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन, उद्योजक समीर नातू, रामभाऊ म्हाळगी समितीचे सदस्य सुजय पत्की, तन्वी हर्बल्सच्या डॉ. मेधा मेहेंदळे, डॉ. मीना व राजारामपुर गोसावी उपस्थित होते. यावेळी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक