शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 24, 2017 02:18 IST

रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच,

अंबाडी : रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच, पण झालेला खर्चही वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.भिवंडी, वाडा, वसई या तालुक्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातपिकानंतर येथील शेतकरी कडधान्ये, फळे व फुलांच्या शेतीसह भाजीपाल्याची शेती करतात. पूर्वी एकमेव भाताचे पीक घेतले जात असे. आता मात्र पांढऱ्या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याची शेती करू लागले आहेत. वेढे, वेढेपाडा, दुगाड, कोशिंबे, वारेट, झडिके, हिवाळी (भिवंडी), चांबळे, डाकिवली, बिलावली, देवघर, गातेस (वाडा), भिनार, शिरवली, आडणे, भाताणे, वडघर (वसई) या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. कांद्याला १० ते १२ दिवसांमध्ये पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत व रासायनिक खतेही दिली जातात. कीटकनाशके फवारणीसह एका एकराला सुमारे ६० हजार इतका खर्च येतो. या वर्षी थंडी पडल्याने कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यातच, गेल्या वर्षी २५ रु पये प्रतिकिलो असणारा भाव घसरून सद्य:स्थितीत चालू वर्षी निम्म्यावर येऊन १० ते १२ रु पये प्रतिकिलो एवढा झाला आहे, अशी माहिती वेढेपाडा येथील चंद्रकांत भोईर, अशोक लाटे, योगेश लाटे व वेढे येथील आत्माराम पाटील या शेतकऱ्यांनी दिली. (वार्ताहर)