शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तीळगुळाची क्रिस्पी वडी, रंगीबेरंगी रेवडी, संक्रांतीसाठी सजला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:01 IST

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत साजरा करण्यात येणारी मकर संक्रांत येत्या-येत्या गुरुवारी साजरी होणार आहे. वर्षभर सर्वच सण- उत्सवांवर कोरोनाचे सावट असून, संक्रांतीवरही ते दिसून येत आहे

ठाणे : येत्या गुरुवारी संक्रांत आल्याने त्या निमित्ताने तीळगूळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. असे असले, तरी कोरोनामुळे ४० टक्क्यांनी खरेदी-विक्रीवर परिणाम झाल्याची खंत दुकान मालकांनी व्यक्त केली. संक्रांतीसाठी यंदा ज्येष्ठांसाठी मऊ तीळगुळाचे लाडू आले आहेत, तर ज्यांना तीळगुळाच्या वड्या खायची हौस आहे, पण चावायला त्रास होतो, अशांसाठी यंदा क्रिस्पी वडी अन आग्र्याचा एक खास पदार्थ म्हणजे रंगीबेरंगी तीळगुळाची रेवडी बाजारात आली आहे.

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत साजरा करण्यात येणारी मकर संक्रांत येत्या-येत्या गुरुवारी साजरी होणार आहे. वर्षभर सर्वच सण- उत्सवांवर कोरोनाचे सावट असून, संक्रांतीवरही ते दिसून येत आहे. ऐरवी घरोघरी तीळगुळाचे लाडू बनविण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अद्याप अनेक ठिकाणी सुरुवात झाली नाही. आता खरेदी ही हळूहळू सुरू आहे. संक्रांत असल्याने बाजारात तीळगूळ विक्रीसाठी आला आहे. 

कच्च्या मालाचे भाव वाढले असले, तरी काही दुकानमालकांनी तीळगुळाचे दर वाढविले नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत तीळगुळाची आठवडाभर आधीपासूनच खरेदी होत असे, परंतु यंदा कोरोनामुळे ही खरेदी ओसरली असून, ४० टक्के फटका खरेदी-विक्रीला बसला आहे, तसेच कोरोनामुळे यंदा मोजकेच तीळगूळ लाडू आणि इतर पदार्थ बनविण्यावर भर असून, ऑर्डरनुसार बनविण्याची तयारी सुरू आहे, असे दुकानमालक केदार जोशी यांनी सांगितले.दरम्यान, आग्राची प्रसिद्ध रेवडी ही ठाण्यात विकली जात आहे. तीळगूळ, ड्रायफ्रूट, शेंगदाणा, यांपासून बनविण्यात आलेली रंगीबेरंगी वडी ही लंबाकृती आहे. ४०० रुपये किलोने ही वडी मिळत आहे. त्यालाही मागणी असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणे