शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पिझ्झा, बर्गर, डोसा राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 00:27 IST

कोरोनाचा फटका : आॅनलाइन राखी खरेदीकडे ग्राहकांचा कल

प्रज्ञा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात ट्रेण्डी राख्या विक्रीसाठी येत असतात. यंदा फूड राख्यांची चलती पाहायला मिळत आहे. बच्चेकंपनीसाठी कार्टून राख्यांबरोबर पिझ्झा, बर्गर, डोसा, पिझ्झा अ‍ॅण्ड आइस्क्रीम राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. दुकानांपेक्षा या राख्यांची आॅनलाइन विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.रक्षाबंधन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा फटका यंदा सणांना बसला असून सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे बाजारातही कमी प्रमाणात राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. कोरोनामुळे आॅनलाइन खरेदीवर ग्राहकांनी अधिक भर दिला. त्यामुळे राख्यांचीही आॅनलाइन अधिक खरेदी होणार असल्याने ५० टक्के परिणाम दुकानातील राख्यांच्या खरेदीवर झाला असल्याचे दुकानमालक चंदरेश देढिया यांनी लोकमतला सांगितले. एरव्ही, एक महिन्यापासून राख्यांची खरेदी सुरू होते, परंतु सण जवळ आला असला, तरी अद्याप खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ठाण्यात दुकानांच्या नियमांचा परिणामही विक्रीवर झाला आहे. लहान मुलांसाठी पब्जी, शिनचान, पापापिग, व्हेनजर्स, सुपरब्रो, नॉटीब्रो, चिलब्रो, कुलब्रो, स्पिनर, डोरेमॉन, मोटू-पतलू, पांडा राखी, एलईडी राखी, रॉकेट, गणेशा राखी, बाळकृष्ण राखी तसेच मोठ्यांसाठी नेहमीप्रमाणे कुंदन राखी, गोंडा राखी, कलकत्ता जर्दोसी राखी, गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटेड राखी, पिकॉक, ओम, रुद्राक्ष अशा विविध प्रकारांच्या आणि रंगांच्या राख्या बाजारात आल्या आहेत. १० रुपयांपासून या राख्यांची किंमत आहे.परदेशात दरवर्षी राख्या पाठविल्या जातात. यंदा मात्र तशी खरेदी न झाल्याचे देढिया यांनी सांगितले. तसेच, राख्यांबरोबर बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला संदेश लिहिलेले भेटकार्डदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.