शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

यंदा स्वस्तातल्या राख्यांकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:48 AM

राख्यांचा बाजार थंडावला : फार नावीन्य नाही; महागाईचाही बसला फटका

ठाणे : राख्यांचा बाजार सलग दुसऱ्या वर्षी थंडावला आहे. यावर्षी राख्यांमध्ये नावीन्य नसल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे, महागाईमुळे ग्राहक नवीन प्रकारांच्या राख्यांपेक्षा स्वस्त राखीबद्दल विचारणा करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.रक्षाबंधन आठवडाभरावर आले आहे. या निमित्ताने ठाण्यात दरवर्षी विविध प्रकारच्या राख्या येत असतात. रस्त्याच्या कडेला, गिफ्ट शॉप्समध्ये, बाजारपेठांमध्ये, हातगाड्यांवर राख्यांची विक्री होत असल्याचे दिसते. काही दिवसांपासून राख्या बाजारात आल्या असल्या, तरी या राख्यांमध्ये फार नावीन्य दिसत नसल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या मताला दुकानमालकांनीही दुजोरा दिला आहे. गेल्यावर्षी जीएसटीच्या भीतीमुळे ३० टक्के राख्या बाजारात आल्या होत्या. विक्रेत्यांना विचारले असता, बाजारात नवीन प्रकार आलेच नसल्याने आम्ही विक्रीसाठी नवीन राख्या ग्राहकांसाठी उपलब्ध करू शकलो नाही, असे ते म्हणाले. ठाण्याच्या बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर पारंपरिक आणि नियमित राख्याच दिसत आहेत. महागाईचा परिणाम राख्यांच्या खरेदीविक्रीवर झाला आहे. यंदा पारंपरिक राख्यांचीच चलती आहे, असे विक्रेता आकाश बोडके याने सांगितले. महिनाभर आधीच राख्या बाजारात आल्या तरी खरेदीसाठी लोकांमध्ये उत्साह नाही. राख्यांमध्ये यंदाही मीनाकारी, मोत्यांची, रुद्राक्ष, इव्हील आय, डायमण्ड, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमण्डची राखी, सिल्व्हर प्लेटेड, गोल्ड प्लेटेड विथ चंदन, डायमण्डमध्ये ओमची राखी, रुद्राक्ष राखी, क्रिस्टल रुद्राक्ष राखी, क्रिस्टल इफेक्टची ब्रास बिट्स, कुंदन राखी असे प्रकार असून यात कलशमध्ये असलेली राखी विशेष लक्ष वेधून घेत आहे. ही राखी ८० रुपये दराने मिळते आहे. या राख्यांची किंमत १० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे.परदेशातील भावासाठी राखी पॅकेजपरदेशात पाठवण्यासाठी खास राखी पॅकेज उपलब्ध आहे. यात राखीबरोबर भेटकार्ड आणि लिफाफा देण्यात येतो. या राखीची किंमत ८० रुपये आहे. या राखीची खरेदी एक महिन्यापूर्वीपासूनच सुरू झाली आहे.इमोजीजची राखी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असलेल्या वेगवेगळ्या इमोजीजच्या राख्यादेखील बाजारात आल्या आहेत. राख्यांवर स्माइलींचे विविध प्रकार आहेत.बच्चेकंपनीसाठी डोरेमन, छोटाभीम : बच्चेकंपनीसाठी नेहमीप्रमाणे कार्टुन राख्या बाजारात आल्या आहेत. त्यातही नावीन्य नाही. नेहमीप्रमाणे छोटाभीम, डोरेमनच्या राख्या प्रामुख्याने आहेत. स्पायडरमनची राखी खास पाउचमध्ये आली आहे. त्या पाउचला स्पायडरमनचा लूक देण्यात आला आहे. ही राखी ४० रुपयांना आहे. त्याचप्रमाणे साईबाबा, गणपती, कृष्णा, मोराची राखीही बाजारात उपलब्ध आहे.पारंपरिक गोंडा राख्यांना पसंतीलाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, नारंगी अशा विविध रंगांच्या गोंडा राख्यांना ग्राहकांची कायम पसंती आहे. महिलांमध्ये डायमण्ड राख्यांचीही क्रेझ असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Rakhiराखीthaneठाणे