शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी रोडावल्याने यंदा उन्हाळी एसटींची संख्याही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:28 IST

परीक्षा संपल्यानंतर,बच्चे कंपनीला वेध लागतात. ते गावी जावून धमाल-मस्ती करण्याचे. त्यामुळे शाळेच्या त्या संपल्या रे संपल्या की बच्चे कंपनी गावी जाण्यासाठी सज्ज असतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागही सज्ज झाला असून सुट्यांमध्ये गावी तसेच देवदर्शनाला जाण्यासाठी विभागीय स्तरावर एसटींचे ‘उन्हाळी नियोजन’ केले आहे.

- पंकज रोडेकरठाणे - परीक्षा संपल्यानंतर,बच्चे कंपनीला वेध लागतात. ते गावी जावून धमाल-मस्ती करण्याचे. त्यामुळे शाळेच्या त्या संपल्या रे संपल्या की बच्चे कंपनी गावी जाण्यासाठी सज्ज असतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागही सज्ज झाला असून सुट्यांमध्ये गावी तसेच देवदर्शनाला जाण्यासाठी विभागीय स्तरावर एसटींचे ‘उन्हाळी नियोजन’ केले आहे. यानुसार,ठाणे विभागातून नियमीत धावणाऱ्या लांब पल्लयाच्या मार्गावरील १५० गाड्यांसह यंदा अतिरिक्त फक्त ४५ बस धावणार आहेत. मात्र,गतवर्षी ज्या मार्गांवर प्रवासी संख्या घटली आहे. त्या मार्गांचा या नियोजनात विचार न केल्याने यंदा २५ बसची संख्या घटल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.‘सुरक्षित प्रवास,एसटीचा प्रवास’ हे राज्य परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य आहे. दिवसेंदिवस एसटी ही खाजगी बसेसच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यातूनच एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. गणपती असो या होळी... हे सण लक्षात घेऊन परिवहन विभागाकडून जादा बसेस दरवर्षी सोडल्या जातात. तसेच उन्हाळ्यातही नागरिकांची गैरसोय होऊन नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी एसटी विभागामार्फत जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ठाणे विभागातील ७ डेपोतून १३ एप्रिल ते १३ जून असे दोन महिन्यांचे नियोजन केले गेले आहे. ते करताना मात्र,यंदा ठाणे विभागाने गतवर्षी केलेल्या ७१ जादा बसची संख्या यंदा थेट ४५ वर आणली आहे. गतवर्षी सोडलेल्या मार्गांचा विचार करताना, कोणत्या मार्गांवर प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्या मार्गांचा यंदा विचारच केला गेलेला नाही. त्यामुळे यंदा जादा बसची संख्या २५ ने घटली आहे. तसेच यंदा ४५ जादा बस दोन महिन्यांच्या कलावधीत धावणार आहेत. पहिल्या टप्प्यास १३ एप्रिलला सुरुवात होणार आहे.जादा बस ९ ठिकाणांहून जाणारराज्यातील २५ ठिकाणांची निवड केल्याने ठाण्यातून ९ ठिकाणी त्याप्रमाणे भिवंडी ५,कल्याण ३,विठ्ठलवाडी ४, भार्इंदर, बोरीवली, वाडा येथून प्रत्येकी एक अशा मार्गांवर या जादा ४५ बस धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ग्रुप बुकिंग नाहीगणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी जशी ग्रुप बुकिंग राबवली जाते. तशी उन्हाळी नियोजनात केलेली नाही. त्यामुळे आॅनलाइन बुकिंगद्वारे सीट नोंदणी करावी लागणार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळthaneठाणे