शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

यंदा अपघातांची संख्या ७३ ने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:18 IST

शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ३७ ब्लॅक स्पॉट; पोलीस उपायुक्तांची माहिती

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षापेक्षा या वर्षी अपघातांचे प्रमाण ७३ ने घटले असून त्यामध्ये मयत आणि जखमींचे प्रमाण ही १६७ ने कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आले आहे. यातील ५० टक्के अपघात हे इतर रस्त्यांवर झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ ब्लॅक स्पॉट हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहेत. या ३७ पैकी १५ स्पॉट हे नॅशनल हायवे नंबर ३ वर असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मंगळवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर कोपरी ब्रीजवरील चार ही लेनचे काम हे मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ८०८ अपघात झाले होते. त्यामध्ये २१५ जणांचा बळी गेला असून ८०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक २०८, गंभीर ३८७ अपघातात आणि किरकोळ १९३ तसेच कोणीही जखमी न झालेले २० अपघातांचा समावेश आहे.तर, २०१९ च्या जानेवारी-आॅक्टोबरमध्ये एकूण ७३५ अपघात झाले आहेत. तसेच १७८ जणांचा बळी गेला असून ६७७ जण जखमी झाले आहेत. प्राणांतिक अपघातात ३७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून गंभीर अपघातात ८६ तर किरकोळ अपघातात ४४ ने जखमींची संख्या घडल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. या वर्षात झालेल्या अपघातांमध्ये नॅशनल हायवेवर १७९ अपघात झाले असून त्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर, किरकोळ अपघातात १४८ जण जखमी झाले आहेत. तर राष्टÑीय महामार्गांवर ५८ अपघात झाले आहेत. त्याध्ये १९ जण मयत तर ४८ जखमी झाले आहेत. त्याचबरोबर इतर रस्त्यांवर ४९८ अपघात झाले असून त्यामध्ये ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८१ जण जखमी झाले आहेत.मध्यंतरी वाढलेल्या अपघात आणि त्यामध्ये मयत आणि जखमींची संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक जिल्ह्यास दिले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली रस्ता सुरक्षा कमिटी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०८ ब्लॅक स्पॉटपैकी ३७ स्पॉट हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना, नियम पाळले तर हे प्रमाण १० टक्क्यांऐवजी निश्चितच ३० ते ४० टक्क्यांनी कमी होईल, असेही उपायुक्त काळे म्हणाले.कोपरीच्या चार लेनचे काम मे २०२० पर्यंत होईलयेत्या मे २०२० पर्यंत कोपरी ब्रीजवरील जाणाºया आणि येणाºया मार्गावरील प्रत्येकी चार लेनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर जो जुना पूल तो तोडण्यात येईल. तसेच या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला वाहतूक शाखेमार्फत लागणाºया सर्वप्रकारच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. वाहतूककोंडी होऊ नये. यासाठी इंच-इंच जागेचा वापर करत आहोत. बारा बंगल्यातील रस्त्यांवरूनही वाहतूक होत असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.एक ते सव्वालाख वाहनांची होत आहे नोंदणी : ठाण्यात दरवर्षी १ ते सव्वालाख वाहनांची नव्याने भर पडत असल्याची माहिती आरटीओ विभागाने वाहतूक शाखेला दिली आहे. या वाढत्या नव्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तसेच या वाहनचालकांच्या मी पहिला जाणार या भावनेतूनही वाहतूककोंडीत जास्त भर पडत असल्याची माहिती वाहतूक शाखेने यावेळी दिली.

टॅग्स :Accidentअपघात