शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात आरटीईद्वारे १३,४०० शालेय प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 00:19 IST

शिक्षणाचा हक्क(आरटीई) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील नामांकित ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश देण्यात येणार आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क(आरटीई) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील नामांकित ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश देण्यात येणार आहेत. या रिक्त जागी बालकांना पूर्व प्राथमिक (केजी)ते पहिलीच्या वर्गाचे प्रवेश मोफत मिळणार आहेत. यासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ मार्चपर्यंत देण्यात आली आहे.इंग्रजी माध्यमासह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा केजी ते पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मनमानी डोनेशन व शुल्क वसूल करतात. त्यामुळे या नामांकित शाळांमध्ये गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. या शाळांमध्ये मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुुंबातील बालकांना आरटीईद्वारे मोफत प्रवेश् देण्याची सक्ती केली आहे. यानुसार या बालकांसाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये एकूण जागांपैकी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. त्यानुसार यंदा सुमारे ६५२ शाळांमध्ये १३ हजार ४०० शाळांमध्ये शालेय प्रवेश होणार आहेत. विद्यार्थ्यांना २०१९ ते २० या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी ँ३३स्र२://१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित होते. यंदा शाळांची संख्या १२ ने वाढली असली तरी त्यातील प्रवेश सुमारे तीन हजार १४६ ने कमी झाले आहेत. आरटीईच्या २५ टक्के आरक्षणातील हे प्रवेश कमी होण्याचे कारण शिक्षण विभागाकडून सांगितले जात नाही.केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलांना आरटीईद्वारे प्रवेश दिला जात आहे. आरक्षित ठेवलेल्या १३ हजार ४०० प्रवेशांपैकी ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात, तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीसाठी आहेत. गेल्या वर्षी प्रवेशप्रक्रिया रेंगाळल्यामुळे व पालकांचा प्रतिसादही कमी होता.सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. त्यावर योग्य तो तोडगा निघाल्यानंतरच दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. १० जूनपर्यंत ती सुरू होती. या प्रवेशावरून सतत गोंधळ सुरू असतो.