शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ठाणे जिल्ह्यात आरटीईचे १० हजार प्रवेश रिक्त, केवळ सहा हजार जागांवर प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 19:01 IST

दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त

ठळक मुद्देआता सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगितलेपाचव्या फेरीत निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त

ठाणे : दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त राहत असल्याचे उघड झाले.पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेशासाठीची आता सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. या पाचव्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली आहे. तरी देखील पालकांनी त्वरीत संबंधीत शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी प्रायमरी केजीसाठी ३६ विद्यार्थी, ज्यू.केजीसाठी ११४, सिनिअर केजीसाठी तीन आणि पहिलीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांचे प्रवेश सध्या संबंधीत शाळांमध्ये घेतले जात आहे. यास अनुसरून पालकांनी त्वरीत संबंधीत शाळेत जावून बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षणा विभागाव्दारे करण्यात आली आहे. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला आता थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामुळे आता सहावी प्रवेश फेरी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याभरात अजून ११ हजार ४७० जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहेत. या प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनात आले.लाखो रूपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गाचे शालेय प्रवेश श्रीमंत पालक घेतात. याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलीना देखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले. पण शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आजूनही या आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पालकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची बाब या चौथ्या फेरी अखेरही उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरत पाच अर्ज रिजेक्ट केले आणि २०६ बालकांच्या आईवडीलांनी संबंधीत शाळांमध्ये संपर्कच साधलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या ११ हजार ४७० जागा आजपर्यंत शिल्लक दिसतआहेत. पहिल्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवडलेल्यापैकी ३४५ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी संबंधीत शाळेत प्रवेश घेतला नाही आणि आता चौथ्याफेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या पाचव्या फेरीतील

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा