शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांतील शॉर्टसर्कीटच्या स्फोटात पतीचा मृत्यू पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:29 IST

भिवंडी : शहरातील कल्याणरोड पाईपलाईन शेजारी असलेल्या शौचालयात चौदा दिवसांपुर्वी घडलेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेत दोनजण जखमी झाले होते.त्यापैकी एकाचा मृत्यू ...

ठळक मुद्देआदर्श सामाजीक सेवा संस्था चालवीत होते शौचालयकल्याणरोड पाईपलाईन शेजारी मनपाचे बीओटी तत्वाचे शौचालयअवैध वीज पुरवठ्याने शॉर्टसर्किट, पतीचा मृत्यू पत्नी जखमी

भिवंडी: शहरातील कल्याणरोड पाईपलाईन शेजारी असलेल्या शौचालयात चौदा दिवसांपुर्वी घडलेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेत दोनजण जखमी झाले होते.त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून पोलीसांनी चौदा दिवसांनंतर आज बुधवार रोजी शौचालय ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.शहाजमाल जादेबाप शेख(५०)असे मयताचे नांव असून तो आपली पत्नी मर्जीना(४५) सोबत शौचालयांजवळ रहात होता. भिवंडी-कल्याणरोड येथील पाईपलाईन शेजारी महानगरपालिकेचे शौचालय असून हे शौचालय बीओटी तत्वावर आदर्श सामाजीक सेवा संस्था चालवित आहेत. या संस्थेने शौचालयाचे काम सांभाळण्याकरीता या दाम्पत्यास ठेवले होते. या शौचालयांत अनाधिकृतपणे वीजपुरवठा सुरू होता. हे माहित असताना २ जानेवारी १९ रोजी रात्रीच्या वेळी त्याच अवैध वीजपुरवठ्याच्या कनेक्शनवर वीजेची शेगडी लावून ते दोघे पाणी तापवित होते. तेंव्हा शार्ट सर्किटने शेगडी फूटुन स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये शौचालयांतील पंखा जळून वाकला तर शौचालयांच्या काचा फुटल्या. याचवेळी जवळच असलेले शहा जमाल जादेबाप शेख व त्याची पत्नी मर्जीना हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर नवी मुंबई येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शहाजमाल याचा १४ जानेवारी १९ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी शौचालय ठेकेदार आदर्श सामाजीक सेवा संस्थेचे अध्यक्ष पिराजी बन्सीलाल कोमलवार (४१) याच्या विरोधात आज बुधवार रोजी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीसांनी त्यास आद्याप अटक केलेली नाही. या घटनेप्रकरणी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने व टोरेंन्ट पॉवर कंपनीने कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी