शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

महानगरातील महाठगांची अशीही दुनिया

By admin | Updated: March 1, 2016 02:05 IST

मुंबई मायानगरी म्हणून देशभर ओळखली जाते. तथापि, येथे ठगदेखील भरपूर आहेत. अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने, या उच्चशिक्षणाचा ठगविण्यासाठी वापर करणारे महाभाग असो किंवा कमी

मनीषा म्हात्रे,  मुंबईमुंबई मायानगरी म्हणून देशभर ओळखली जाते. तथापि, येथे ठगदेखील भरपूर आहेत. अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने, या उच्चशिक्षणाचा ठगविण्यासाठी वापर करणारे महाभाग असो किंवा कमी किमतीत दागिने, वस्तू मिळवून देण्याचे आमिष असो, अनेकदा सामान्य मुंबईकर या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत. कधीही न पाहिलेल्या अमेरिकन बॉण्डच्या नावाखाली कर्जाचे आमिष दाखवून, तर कुठे दैवी शक्तीच्या नावाखाली फसवणुकीचे दुकान उघडल्याचेही अनेकदा आढळून आले. सध्या मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांपैकी २० टक्के गुन्ह्यांचे प्रमाण हे फसवणुकीचे आहे. गेल्या वर्षभरात आर्थिक गुन्हे शाखेत १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ५५ अब्जांहून अधिक रकमेवर या ‘महाठगां’नी डल्ला मारल्याची नोंद आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात हे उच्चशिक्षित महाठग नवनवीन शक्कल लढवितात. ठगांच्या नानाविध क्लृप्त्यांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी २० टक्के गुन्हे हे फसवणुकीचे आहेत. पूर्वी ५० लाखांपर्यंतच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करत होते. सध्या ३ कोटींपर्यंतचे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून हाताळले जातात. ३ कोटींपुढील फसवणुकीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येतात. त्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या दफ्तरी गेल्या वर्षभरात १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ठगींसह धोकाधडीतून ५५ अब्ज ६० कोटी ६६ लाख ११ हजार २०६ रकमेवर ठगांनी डल्ला मारल्याची नोंद आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. त्यापैकी केवळ ३ कोटी ८८ लाख १५ हजार ६८२ रकमेची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे.१४ मार्च २०१५ - स्वत:ला बियाणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगून, उच्चशिक्षित अशोक बियाणी नावाच्या याने नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला. फॉरेन फंडिंगच्या नावाखाली कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून, धनाढ्य व्यावसायिकांना कोट्यवधीचा चुना लावणे एवढेच त्याचे काम होते. या पैशांतून त्याने पवई येथील रेनेसॉ या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुलीचा विवाह पार पाडला. तब्बल ६० लाख रुपये त्याने या विवाहासाठी खर्च केले होते. च्२२ फेब्रुवारी - गिरगाव येथील मराठमोळ्या कुटुंबात वाढलेल्या टेंभेच्या उच्चभ्रू राहणीमानाने अनेकांचे डोळे विस्फारले होते. टेंभेचे वडील मंत्रालयात नोकरीला आहेत. टेंभेला मात्र नोकरी मिळत नव्हती. झटपट पैसा कमविण्यासाठी तिने दागिन्यांची हौस असलेल्या महिलांना टार्गेट करण्याचे ठरविले. कस्टम, जेट एअरवेजमध्ये कामाला असल्याचे सांगून तेथे पकडलेले गोल्ड कॉइन कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून ती महिलांची फसवणूक करू लागली. लग्नसमारंभ, बड्या पार्ट्या, पार्लरमध्ये ती महिलांशी ओळख करून घेई. तिच्याविरुद्ध जम्मू-काश्मीर, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह विविध ठिकाणी २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दादर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.