भिवंडी : शहरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या परप्रांतीय अस्थायी यंत्रमाग कामगारांना पगारापोटी मिळालेल्या पाचसे-हजाराच्या नोटा बदलून घेण्यास अडचण आली. शहरात सुमारे पाच लाख यंत्रमाग कामगार असून, त्यापैकी अर्धे अधिक कामगार परप्रांतीय आहेत. त्यांच्याकडे रहिवासी पुरावा नसल्याने त्यांचे बँक खातेदेखील नाहीत. या कामगारांचा पगार साधारणत: प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखांच्या दरम्यान रोख स्वरूपात होतो. दरम्यान मालकांनी या नोटामार्फत पगार केला. पोस्टात सेव्हींग खातेदारांचे पैसे स्वीकारण्याचे काम सुरू होते. शहरातील बँकेत गर्दी झाल्याने अनेक कामगारांना आपला रोजगार बुडवून जुन्या नोटा वटविण्यासाठी जावे लागले. उद्या शुक्रवारची सुट्टी असल्याने शहरातील यंमत्रमाग कारखाने बंद असतात. त्यामुळे बँकेतील व पोस्टातील गर्दीत कामगारांची भर पडणार आहे. (प्रतिनिधी) पोस्ट आॅफिसने पाहिली गर्दी!भातसानगर : पोस्ट आॅफिस कार्यालयातून मनी आॅर्डर, तार, वा पैसे जमा करण्यासाठीही अशा रांगा कधी पोस्ट कार्यालयात दिसल्या नाहीत; मात्र आज दिवसभर पैसे भरण्यासाठी बँकांसह पोस्टानेही गर्दी अनुभवली. शहापुरात झुंबड; वाहतूककोंडीशहापूर : पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठ आणि बँकत भरण्यासाठी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सकाळपासून ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पार्किंगची सुविधा नसल्याने बँकसमोर असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यावरही बँकानी ग्राहकांना सेवा दिली.चित्रपटगृहांच्या धंद्याला ४० टक्के नुकसानडोंबिवली : पाचशे व हजारच्या नोटा बाद केल्याने चित्रपटगृहांच्या व्यवसायाला ४० टक्के फटका बसला. नुकसान होत असले तरी व्यवसायात स्थैर्य येण्यासाठी आणखीन काही काळ जावा लागेल, अशी माहिती डोंबिवलीतील चित्रपटगृहांचे मालक चालक महेंद्रभाई विरा यांनी दिली. डोंबिवलीत टिळक, पूजा, मधूबन आणि गोपी ही मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे विरा यांची आहेत. चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांकडून पाचशे व हजारच्या नोटा घेणे बंद केले. नुकसान होत असले तरी आम्ही शो बंद केले नाही. दिवसाला पाच शो होत आहे. प्रेक्षक येत नाहीत.बँकांमधील पैसे संपले!मीरा रोड : चार हजार रुपयां पर्यंत नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये लांबलचक रांगा लागल्या होत्या; पण बँकांमधील पैसे संपल्याचे सांगून कमी पैसे काढण्यास सांगितले जात होते. अनेक खातेधारकांनाही बॅकेत पैसे नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. कल्याण पूर्वेत बँकेत ग्राहकांची गर्दीकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील सर्वच बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. ग्राहकांनी रांगेत उभे राहून सहकार्य केले, अशी भावना कल्याण जनता सहकारी बँकेचे संचालक हेमंत दरगोडे व प्रा. विलास पेणकर यांनी व्यक्त केली. लाखोची रोख बँकेत भरणार कशी? व्यापाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक चिंतेत : उल्हासनगर : शहरातील मुख्य मार्केट दुसऱ्या दिवशीही ओस पडून व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र आहे. बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांसह इतरांना घरातील लाखोची रक्कम बँकेत कशी भरणार? याची चिंता लागल्याचे वातावरण शहरात आहे. शेतीचे कामे सोडून धावाधावटोकावडे : टोकावडेतील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोटा बदलण्यासाठी व पैसे काढण्यासाठी सकाळी ९ वाजेपासून लांबच लाब रांगा लागल्या होत्या. एकीकडे शेतीची कामे सुरू असून, दुसरीकडे थोडेफार पैसे असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळाली.आदिवासींनी परत केली मजुरीआसनगाव : परिसरातील सर्वसामान्य आदिवासींना शेतमजुरीपोटी मिळालेल्या पाचशे व हजारच्या नोटा त्यांनी शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक यांना परत केल्या आहेत. मात्र त्या परत मिळेपर्यंत त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता सुटे पैसे हातात येईतो, यांना थांबणे गरजेचे आहे.
काम सोडून यंत्रमाग कामगारांची धावाधाव
By admin | Updated: November 11, 2016 03:02 IST