शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांना सेल्फीचा मोह आवरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:59 IST

मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते.

ठाणे : मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते. असे असूनही त्यातूनच सवड काढून रॅलीमधून सेल्फी काढण्याचा मोह पदाधिकाऱ्यांना आवरत नसल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. अनेक ठिकाणी भरउन्हात अशा भेटीगाठींदरम्यान दिवसाला १० ते १५ सेल्फी काढून नंतर फोटो फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे. एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी आता झडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रचारात आता खºया अर्थाने रंगत चढू लागल्याचे दिसत आहे. एका उमेदवाराने एखाद्या ठिकाणी भेट दिली, तर दुसरा उमेदवारही तितक्याच ताकदीने मतदारांशी संवाद साधताना दिसतो. मात्र, मतदारांशी होणाºया या भेटीगाठींदरम्यानही सेल्फी काढण्याचा मोह अनेक पदाधिकाऱ्यांना आवरता येत नसल्याचे दिसते आहे. प्रचारादरम्यान किती गर्दी आहे, आम्ही देखील या प्रचारात हजर होतो, असे कदाचित दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे, ‘ले - ले सेल्फी ले ले’, असे म्हणत सध्या प्रचारात सेल्फी झोन शोधला जात आहे.