शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या तहसिलदारांसह नायबतहसीलदार -कर्मचा-यांचे मंगळवारपासून काम बंद;असहकार आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:16 IST

महसूल विभागाच्या तहसिलदारांसह नायबतहसीलदार, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी मंगळवार - १० आॅक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत.

ठाणे - महसूल विभागाच्या तहसीलदारांसह नायबतहसीलदार, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी मंगळवार - १० आॅक्टोंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत. या असहकार आदोलनात कोकण विभागासह राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील सुमारे ३० हजार अधिकारी - कर्मचारी सहभागी होणार आहेत. कार्यालयात उपस्थित राहणार पण प्रशासकीय कोणतेही काम या आंदोलनादरम्यान केले जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले.आधीच राज्यभरातील पुरवठा कर्मचा-यांनी सात दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासह प्रलंबित असलेल्या आवश्यक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व प्रत्येक तहसिलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मंगळवारी कार्यालयात येतील मात्र ते कोणतेही काम करणार नाहीत. कार्यालयीन वेळेत ते कार्यालयात राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय कामास हात लावणार नसून पूर्णपणे असहकारचा प्रवित्रा घेणार असल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकारthaneठाणे