शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांनी सुचवलेल्या कामांना जि.प. सदस्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 01:34 IST

२0 रस्त्यांची कामे : स्वत:च्या कार्यक्षेत्रातच कामे करण्याचा सल्ला

ठाणे : जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी गावपाडे परिसरांसाठी सुचवलेल्या सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या २० कामांना जिल्हा परिषदेच्या (जि.प.) सदस्यांनी तीव्र विरोध केला. आमच्या कार्यक्षेत्रातील कामे या लोकप्रतिनिधींनी निश्चित केली, तर मग आम्ही कोणती कामे करायची, ग्रामस्थ आम्हाला जाब विचारतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची कामे आम्ही करणे अपेक्षित असल्याचा सूर सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सोमवारी लावला.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जि.प. अध्यक्षा दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष पवार, सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने आदींच्या नियंत्रणात ही सभा पार पडली. नुकत्याच झालेल्या डीपीसी बैठकीत खासदार, आमदारांनी गावखेड्यांच्या रस्त्यांची कामे सुचवली. जि.प.ची मंजुरी घेण्यासाठी बांधकाम विभागाद्वारे ही कामे सभागृहासमोर सादर करण्यात आली. यावेळी जि.प.च्या मालकीच्या रस्त्यांची कामे खासदार, आमदारांनी सुचवल्यानंतर जि.प. सदस्यांना रस्त्यांची कामे करायला मिळणार नाहीत. खासदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणी निधी खर्च करण्यास वाव असल्याचे कारण समोर करत, बहुतांश सदस्यांनी या रस्त्यांच्या कामास विरोध दर्शविला.साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या जिल्हा परिषदेच्या २० रस्त्यांची कामे खासदार, आमदारांनी सुचवली आहेत. त्यासाठी अद्याप निधीही मिळालेला नाही. पण, मंजुरीसाठी सभागृहासमोर प्रस्ताव मांडण्यात आला. निधी जसा मिळेल, तशी कामे केली जातील, असे कार्यकारी अभियंता पालवे यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. त्यावर सदस्यांनी विरोध दर्शवला. या सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न दीपाली पाटील यांनी केला असता, विरोध काही अंशी मावळला.या चर्चेत सदस्य सुभाष घरत, गोकुळ नाईक, कैलास जाधव आदी सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळांना डिजिटल साहित्य पुरवण्याचा विषय पुन्हा चर्चेला आला. या भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याची मागणी सदस्यांनी केली.चर्चेला आलेले विषयकृषी व पशुसंवर्धन समितीच्या सदस्या दयाबाई शेलार या समितीच्या बैठकीस सहा महिन्यांपासून गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे समिती सदस्यपद रद्द झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.याप्रमाणेच मुख्य इमारत बांधण्याच्या विषयासह जागेअभावी शाळामंजुरीचा निधी परत जाणे, जुन्या इमारती पाडणे, ग्रामपंचायतींच्या इमारतींची बांधकामे, गावखेड्यांमधील सुशिक्षित तरुणतरुणींना उद्योगधंदे, स्वयंरोजगार, शासनाच्या योजनांवरील मार्गदर्शक पुस्तकांचा स्टॉल जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी सुरू करण्याची मागणी, जादा उत्पन्न देणाऱ्या गावांचा महसुली गावे म्हणून समावेश करण्याची मागणी, महसूल गोळा झाल्यानंतर पंचायत समित्यांना त्यांचा हिस्सा मिळत नसल्याची खंत आदी विषयांसह रस्ते खोदण्यास विरोध, एमआरईजीएसची कामे तसेच बँकांमधील ठेवीवरील व्याज न मिळण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद