शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कामांच्या फाइल्स सरकल्याच नाही

By admin | Updated: September 5, 2015 22:19 IST

सत्ताधाऱ्यांसमोर काहीही न चालल्याने त्याचा फटका वॉर्डातील विकासकामांना बसला आहे. शहरात सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असताना या ठिकाणी मात्र साधे यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ते

-  अनिकेत घमंडी,  डोंबिवलीसत्ताधाऱ्यांसमोर काहीही न चालल्याने त्याचा फटका वॉर्डातील विकासकामांना बसला आहे. शहरात सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असताना या ठिकाणी मात्र साधे यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ते आणण्यात नगरसेवक हृदयनाथ भोईर अपयशी ठरले आहेत. यामुळे येथील नागरिकांना त्या सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे. अशीच समस्या कचऱ्याचीही असून वेळोवेळी घंटागाडीची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने काणाडोळा केल्याने नागरिक त्रस्त आहेत. घनश्याम गुप्ते क्रॉस रोडवरील कुंडीतून नेहमीच कचरा वाहत असतो. विविध कामांच्या फाइल्स सादर करूनही त्या पुढे सरकलेल्याच नाहीत. पारंपरिक मतांच्या आधारावर निवडून आलेले जयहिंद कॉलनीचे नगरसेवक हृदयनाथ सुदाम भोईर हे सत्ताधाऱ्यांसमोर हतबल झालेले आहेत. बुधवारचा आठवडाबाजारदेखील एक समस्या असून ती आता नागरिकांची गरज असल्याचे सांगून त्यांनी हात वर केले. वॉर्डात रस्ते-गल्ल्यांपेक्षा जास्त स्पीडब्रेकर असल्याने वाहनचालकांमध्ये संताप आहे. धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटचीही समस्या मोठी असून केवळ शासनाचे धोरण चुकीचे असल्याचे कारण देऊन या ठिकाणी ठाकुर्लीची घटना घडल्यानंतरही नागरिकांनी महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही ते केलेले नाही. त्यामुळे केवळ तांत्रिक बाबीवर बोट ठेवून धन्यता मानून नगरसेवकानेही अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारले आहे. वॉर्डात एकही गार्डन नाही, खेळण्याची सुसज्ज जागा नाही, त्यामुळे युवक-विद्यार्थी आदींसह ज्येष्ठांची गैरसोय होते. एकही मोठा प्रकल्प येथे झालेला नाही. बंदिस्त गटारे, रस्त्याचा आडोसा आदी भागात ज्येष्ठांसाठी बेंचेस (बाकड्यांची) सोय करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा उपद्रवी घेतात. त्यामुळेही नागरिक त्रस्त आहेत. केडीएमटीची बससेवा येथे नाही. कसेही कुठेही पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडीची समस्याही मोठी आहे. स्कूलबससह अन्य आपत्कालीन समस्येत त्याचा त्रास होतो. या परिसरात आनंदनगरचा काही भाग, आनंद कुटीर, सम्राट चौकाचा काही भाग, कांचनगौरी सोसायटी, सुदाम भोईर चौक आदी परिसर येतो. यूटीडब्ल्यूटीअंतर्गत तीन वॉर्डांतून ११ कोटींची फाइल मंजुरीसाठी सादर केली होती. परंतु, ती मंजूर झाली नाही. स्थायीच्या सभापतीसह काही सदस्य तसेच केडीएमटीचेही सदस्य पश्चिमेला राहतात. तरीही, या ठिकाणच्या नागरी तसेच वाहतुकीच्या समस्या सुटलेल्या नाहीत. स्पीडब्रेकर असावेत, ही नागरिकांचीच मागणी. कचऱ्याची समस्या सोडवणे हे केवळ मलाच नव्हे तर महापालिकेला आव्हान आहे.- हृदयनाथ भोईर, नगरसेवक