शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पूल दुरुस्तीचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 05:36 IST

वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे.

मीरा रोड : वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे. अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्ट बसवण्याचे काम चिंचोटी व वरसावे पुलाजवळ अजून पूर्ण झाले नसले तरी, प्राधिकरणाने आणखी वाट न पाहता दुरु स्ती सुरु केली आहे. पुलावरील एक मार्गिका बंद करण्यात आली असून, आता एका मार्गिकेवरूनच वाहतूक सुरु आहे.राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या या पुलाच्या जॉइंट्स प्लेट्स नादुरु स्त झाल्याने अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाने वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची मागणी केली होती. अखेर पालघर जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना काढली. वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याची शक्यता पाहता संपूर्ण पूल बंद ठेवण्याऐवजी एक मार्गिका बंद ठेऊन दुरु स्ती काम करणे आणि दुसºया मार्गिकेवरून लहान वाहने सोडणे, असे ठरवण्यात आले.मोठी वाहने वळवण्यासाठी मनोर येथे दोन ओव्हरहेड गेंटरी उभारल्या आहेत. चिंचोटी येथे दोन व वरसोवा पुलाआधी एक ओव्हरहेड गेंटरी उभारण्याचे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरु होते. मनोर येथे साडे तीन मीटर उंचीची तर चिंचोटी व पुलाजवळ सुमारे सव्वादोन मीटर उंचीची ओव्हरहेड गेंटरी उभारणाार आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी मोठी वाहने वाडा, शिरसाड व अंजूर फाटामार्गे भिवंडीवरून ठाणे - मुंबईला वळवण्यास सुरवात झाली आहे. दुरुस्तीचे काम मंगळवारीच सुरु करण्यात आले होते; मात्र ते बंद करण्यात आले. शुक्रवारी ते पुन्हा सुरु झाले. पुलावरून एकेरी वाहतूक सुरु झाल्याने वसईच्या दिशेला मोठी वाहतूककोंडी होणार आहे.>अवजड वाहनांना वाडा, शिरसाड, अंजूरफाटा येथून वळवण्यासह पुलाजवळ वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांसह जिल्हा पोलीस व स्थानिक पोलीस सज्ज आहेत. आयआरबीकडून ट्रॅफिक वार्डन पुरवले जाणार आहेत .-ए.आर. संकेश्वरी,वाहतूक पोलीस निरीक्षक>मंगळवारी सायंकाळपासून पुलाच्या दुरु स्तीचे काम सुरु केले. एक मार्गिका बंद करण्यात आली असून वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली ठेऊन काम करणार आहोत. नाताळची सुट्टी सुरु होणार असल्याने वाहतूक वाढण्याची शक्यता पाहता काम लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.-दिनेश अगरवाल,विभागीय व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण