शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

निविदा दाखल न केलेल्या कंपनीलाच दिले ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:12 IST

ठामपा ‘कोमात’ : दवाखाने उभारणारे वन रुपी क्लिनिक अडचणीत

ठाणे  : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीत दोन वर्षांपूर्वी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. जॉइंट व्हेंचरमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार होती. ज्या कंपनीसोबत जॉइंट व्हेंचर केले जाणार होते त्या कंपनीऐवजी निविदा प्रक्रियेत सहभाग न घेतलेल्या कंपनीला हे काम दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवरच उपचार करण्याची गरज असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे  पालिकेने शहरात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. पुढील पाच वर्षांत पालिका १६० कोटींचा खर्च करणार आहे. शहरात ५० दवाखाने (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेसह शासनाच्या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळतात त्यासाठी ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खासगी संस्थेला द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच या योजनेला विरोध होता.विधानसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते यातील पाच दवाखान्यांचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षात एकही दवाखाना संस्थेला सुरू करता आला नाही. त्यामागचे कारण आता उघड झाले आहे. जॉइंट व्हेंचरमध्ये राबवण्यात येणाऱ्या ‘आपला दवाखाना’ या संस्थेला कार्यादेश देणे अपेक्षित होते. परंतु या कंपनीतील एक भाग असलेल्या दुसऱ्या कंपनीलाच हे काम देण्यात आले आहे. ही दुसरी कंपनी या निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. ११ जुलै २०२० रोजी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हे कार्यादेश देण्यात आले. जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीने या विरोधात पालिकेला नोटीस बजावली असून १५ दिवसात याचे उत्तर द्यावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. वन रुपी क्लिनिकची ‘त्या’ ठेकेदाराने केली फसवणूक ज्या कंपनीला कार्यादेश देण्यात आला त्या कंपनीला हे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या कंपनीने ४९ टक्के शेअर देत हे काम वन रुपी क्लिनिकला दिले. वन रुपी क्लिनिकने यासाठी १ कोटी ६६ लाखांचा खर्च करून मागील दोन महिन्यांपासून शहरात तब्बल २० ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत. प्रत्येक दवाखान्यात रोजच्या रोज ८० ते १०० रुग्ण ओपीडीला येत आहेत. त्यात रुग्णांकडून फी आकारली जात नाही. गेले दोन महिन्यांच्या कामाचा मोबदला मिळावा यासाठी वन रुपी क्लिनिकने जेव्हा पालिकेकडे पत्रव्यवहार केला. तेव्हा त्यांच्याही लक्षात हा घोळ आला. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीकडे केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून संपर्क केला. परंतु ज्या कंपनीने निविदाच भरलेली नाही व त्यामुळे त्यांना काम मिळालेले नाही, त्या कंपनीच्या नावाने केलेल्या कामाचा धनादेश कसा निघणार, असा पेच उभा ठाकला आहे. दोन महिन्यांपासून ‘आपला दवाखाना’ सुरू केला. यासाठी १ कोटी ६६ लाखांचा खर्च  केला आहे. परंतु पालिकेने केलेल्या चुकीचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागत आहे. आमच्या कामाचे पैसे मिळत नसतील तर आपला दवाखाना सुरू ठेवणे शक्य होणार नाही.- डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिकसुदैवाने अद्याप बिल काढले नाहीयामध्ये जॉइंट व्हेंचर  कंपनीची व वन रुपी क्लिनिकची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता धनादेश कसा काढावा, असा पेच निर्माण झाल्याने पालिकेने ज्या कंपनीला कार्यादेश दिला त्याला सुदैवाने अद्याप बिल दिलेले नाही. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत लागलीच काहीही माहिती देणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका