शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत होणार पूर्ण- श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:53 IST

गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण : ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अनंत अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पास गेल्या साडेतीन वर्षांत गती मिळाली असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती शिवसेना खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.ठाण्यापुढील उपनगरीय रेल्वेसेवेतील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा आढावा डीआरएम मुंबई कार्यालयात अलीकडेच घेतला. यावेळी रेल्वेचे व्यवस्थापक सलभ गोयल, संचालक संजीव मित्तल, आ. बालाजी किणीकर, ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. दिवा-ठाणे यादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांस २००८ मध्ये मंजुरी मिळाली. प्रकल्प अडचणीत आला होता. २०१४ साली शिंदे खासदार झाल्यावर त्यांनी या प्रकल्पास गती दिली. रेल्वेने मार्गिकांचे आरेखन बदलले व नवे आरेखन सीआरझेडमधून जात होते. त्यासाठी केंद्राची परवानगी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक जमीन तर ठाणे महापालिकेकडून आवश्यक परवानगी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत प्रकल्पास गती मिळाली. कोरोनाचे संकट आल्याने प्रकल्पाची डिसेंबर २०२० ही डेडलाइन हुकणार असली, तरी आता मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकाचे रिमॉडेलिंगचे काम मार्गी लावण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या, उपनगरीय गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. रिमॉडेलिंगचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण पत्रीपुलापासून थेट कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.