शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या निषेधार्थ महिलांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:20 IST

उल्हासनगरवासीय त्रस्त : हंडाभर पाण्यासाठी सुरु आहे वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर पूर्वेतील दुर्गादेवी पाडा, भावेश कॉलनी, अशोक पाटील कॉलनी, साई प्रसाद कॉलनी, ज्ञानामृत शाळेजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.

शहर पूर्वेच्या अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असून दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे करूनही टंचाई कायम होती. अखेर मंगळवारी महिलांनी नेताजी चौकातील पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. पूर्वेतील सुभाष टेकडी परिसरासह अन्य परिसरातील पाणीपुरवठ्यबाबत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी महापालिकेत गेल्या शुक्रवारी नागरिक व पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, काही कारणास्तव प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दोनच दिवसांनी संतप्त महिलांना पाणीटंचाईच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करावे लागले.शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ४०० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक विभागांत अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुर्गापाड्यासह अन्य विभागातील अनेक घरांचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे १५ दिवसांपासून अचानक खंडित केला आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी संताप व्यक्त केला असून, पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 

पाणीपुरवठा होणार पूर्ववत - रहेजा शहरातील दुर्गापाड्यासह अन्य ठिकाणचा पाणीपुरवठा रस्ता रुंदीकरणात जलवाहिन्यांना गळती लागल्याने, खंडित होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन गळती लागलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सांगितले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. जे. रहेजा यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी