शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा भाईंदरहून सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:24 IST

भार्इंदर स्थानकातून सुटणारी सकाळची नऊ वाजून सहा मिनीटांची भार्इंदर - चर्चगेट महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असे आश्वासन

मीरा रोड : भार्इंदर स्थानकातून सुटणारी सकाळची नऊ वाजून सहा मिनीटांची भार्इंदर - चर्चगेट महिला लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असे आश्वासन तीन डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी खासदार राजन विचारे यांच्या सोबतच्या प्रवाशांच्या शिष्टमंडळास दिले होते. पण बुधवारी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी रेल्वेमंत्र्यांचे पत्र दाखवत २५ डिसेंबर पासून महिला लोकल पुन्हा सुरू होणार असे सांगितले. तर माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन यांनाही रेल्वे खात्याकडून मंगळवारी पत्र आले असून त्यांनाही २५ डिसेंबरपासून लोकल सुरू करणार असल्याने आंदोलन करू नका असे कळवले आहे. रेल्वेमंत्र्यांच्या पत्रावर दिनांक व जावक क्रमांकच नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एक नोव्हेंबरपासून बंद केलेली भार्इंदर स्थानकातून सुटणारी महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू होण्यासाठी तीन डिसेंबरला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल गुप्ता व अन्य अधिकाऱ्यांसोबत खासदार राजन विचारेंसह महिला प्रवासी व सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आदींची बैठक झाली होती. या बैठकीत २५ डिसेंबरपासून महिला स्पेशल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.माजी काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तीन दिवस सह्यांची मोहीम राबवली. २० डिसेंबरला रेल रोकोचा इशाराही हुसेन यांनी दिला होता. पश्चिम रेल्वेच्या आॅपरेशनल विभागाचे अपर मंडळ व्यवस्थापक विनयकुमार श्रीवास्तव यांनी हुसेन यांना १९ डिसेंबरला पत्र पाठवून २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरु होणार असल्याने आंदोलन करू नका असे कळवले आहे.आ. मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन महिला लोकलसाठी आपण रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिले होते असे सांगत २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरु होणार असल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले गोयल यांचे पत्रही दाखवले. खा. विचारे यांच्या आधी आपण मंत्र्यांना भेटलो होतो. मंगळवारी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळीच मंत्री गोयल यांना आपण पुन्हा सांगितले असता त्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना फोन करून निर्देश दिले होते असे मेहता म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने केलेली मागणी व चालवलेले आंदोलन यामुळे महिला लोकल सुरू होत असून मेहता यांनी दाखवलेल्या रेल्वेमंत्र्यांच्या पत्रावर दिनांक व जावक क्रमांकच नसल्याचा मुद्दा मुझफ्फर यांनी उपस्थित केला. लोकल सुरू करण्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपा उद्योग करत असल्याची टीका त्यांनी केली.खालच्या पातळीचे राजकारण करू नकाखासदार आपण असून रेल्वेची कामे ही आपल्याशी संबंधित आहेत. तीन डिसेंबर रोजीच रेल्वे महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत २५ डिसेंबरपासून महिला लोकल पुन्हा सुरू होणार याचा निर्णय झालेला असताना भाजपा व काँग्रेसने फुकटचे श्रेय लाटण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करू नये असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकल