शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पाण्यासाठी श्रमजीवीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 04:50 IST

ठामपा अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द : घोडबंदर येथील गावपाडे, आदिवासी वस्त्यांत भीषण टंचाई

ठाणे : घोडबंदर भागाचा झपाट्याने विकास होत असताना येथील गावपाड्यांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. या भागातील गावपाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिला रिकामे हंडे-मडके घेऊन सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी महापालिका अधिकाºयांना सुपूर्द केले.

ठाणे महापालिकेची निवड स्मार्ट सिटीच्या यादीत झाली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून ठाण्यात अस्तित्वात असलेले मूळ ठाणेकर नागरिक अद्यापही पाण्यासारख्या मूलभूत सोयींपासून वंचित आहेत. ठाण्यातील समतानगर, पातलीपाडा, इंद्रापाडा, डोंगरीपाडा, बोरिवडे, भार्इंदरपाडा, वळकरीपाडा, ओवळा-टकरडा, पानखंडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोकणीपाडा आदी आदिवासीपाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, येथील कुटुंबांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या पाणीटंचाईच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो आदिवासी महिला डोईवर हंडे-कळशा आणि रिकामे मडके घेऊन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पर्यायी पाणीव्यवस्थेसह वैयक्तिक नळजोडणी करून देण्याची आणि शौचालय, स्मशानभूमी, वनहक्क दावे आणि इतर मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याबाबत पालिका अधिकाºयांना मोर्चेकºयांनी निवेदन दिले. आदिवासीपाड्यांतील पाच ते सात ठिकाणांवर पाणीटंचाई असल्याचे मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. समतानगर, पातलीपाडा येथे पाणी आहे. मात्र, काहीजण पंप लावून पाणी खेचत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन टंचाई निर्माण होत आहे.पाण्यासाठी दाही दिशायाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच वितरणव्यवस्थेसह नवीन पाण्याची टाकी आणि पंपदेखील बसवले जाईल. पानखंडा भागात नियमित टँकरची सुविधा पुरवली जाते. शिवाय, कूपनलिकाही आहेत. तरीही, काही समस्या असतील तर, त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले. या गावपाड्यांत सुमारे २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, पाण्यासाठी त्यांना दाही दिशा फिरावे लागते आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका