शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये महिला जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 03:09 IST

दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच लहानमोठ्या घरगुती कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच लहानमोठ्या घरगुती कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या ८७ जणांचे प्राण वाचवण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील आठ महिन्यांत यश आले. समुपदेशन करून त्यांना जीवन जगण्याची नवी दिशा देण्याचे कामही येथे केले जात आहे. जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण दुपटीपेक्षाही जास्त आहे.आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ३०६ जणांचे प्राण वाचवण्यात आले होते. ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाºयांकडून रूग्णांसोबत जिव्हाळ्याचे नाते जपले जाते. बदलती जीवनशैली आणि स्पर्धात्मक युगाच्या जाळीत प्रत्येकाचे जीवन एका माशाप्रमाणे अडकत चालले आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा अपमान, प्रेमभंग किंवा एखादी गोष्ट मनासारखी न मिळाल्यास ताणतणाव वाढतो. त्यातून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. आत्महत्येचे प्रकार वेगवेगळे असतात. कुणी उंदीर मारण्याचे विषारी औषध किंवा फिनेलसारखे द्रव्य प्राशन करतो. अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केलेले रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्यावर त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे तर या रु ग्णांचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीक्षा रोहिल्ला, जिनी पटणी, परिचारिका गौतमी म्हसकर, जयश्री श्रीधनकर व समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय व मनोविकृती) श्रीरंग सिद हे समुदेशन करतात. त्यांना आशेचा नवीन किरण दाखवण्याचे मोलाचे काम ही मंडळी करते.

टॅग्स :thaneठाणे