शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:31 IST

नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादीने केला निषेध : केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

ठाणे : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकरी भाजून नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून घोषणा दिल्या.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बुधवारपासून वाढ केली आहे. एलपीजी गॅसच्या किमतीतील ही सलग सहावी वाढ आहे. दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ठाण्यातील कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार, मोदी सरकार हाय-हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, चुल्हा जलाओ- मोदी भगाओ, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.‘मायभगिनी सरकारला सत्तेवरून खेचतील’विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेले हे सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरीब माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. तरीही, मोदी सरकार गॅस सिलिंडर या मूलभूत गरजेकडे लक्ष देत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देणाºया मोदी सरकारची गरीबविरोधी नीती आता जनतेसमोर आली आहे. त्यामुळे आता देशातील मायभगिनी मोदी आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.‘चुलीची धग मोदीसरकारला भस्मसात करेल’अच्छे दिनचे आश्वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आधी रेशनिंग दुकानात रॉकेल मिळत होते. तेदेखील बंद केल्याने महिलांना गॅस सिलिंडरऐवजी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुलीची ही धगच मोदी सरकारला भस्मसात करेल, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केली.