शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधनामुळे वाचले महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 17:14 IST

उपनगरी रेल्वेमध्ये चढताना नाजिया सहजाद शेख (४५) ही महिला पाय घसरुन खाली पडत असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) पोलीस कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्दे समयसुचकता दाखवून महिलेला रेल्वेमध्ये ढकलले आरपीएफने केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या उपनगरी रेल्वेमध्ये चढताना नाजिया सहजाद शेख (४५) ही महिला पाय घसरुन खाली पडत असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) पोलीस कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. महिला प्रवाशाचे प्राण वाचविणाºया या पोलीस शिपायाचे रेल्वे वर्तुळात कौतुक होत आहे.मुंब्रा येथील किस्मत कॉलनी येथे राहणारी नाजिया ही मुंब्रा येथून मुंबईला जाण्यासाठी उपनगरी रेल्वेने जाण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोन येथून १२ डिसेंबर रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास चढली. चढतांना तिने आधी तिची नऊ वर्षीय मुलगी आत शिरली. नंतर ती चढत असतांनाच रेल्वे फलाटावरुन सुटली. त्यामुळे तिचा पाय सटकला. यात तोल गेल्यामुळे ती रेल्वेमधून खाली पडत असल्याची बाब त्याच स्थानकावर नेमणूकीस असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल मंगेश वाघ यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, त्या महिलेला त्यांनी पुन्हा रेल्वेमध्ये ढकलत तिचे प्राण वाचविले. अशा घटनांमध्ये प्रवाशाला बाहेर ओढले जाते, पण या घटनेमध्ये या महिलेला बाहेर ओढले असते तर तिच्यासह वाघ यांच्याही जीवाला धोका पोहचला असता. त्यामुळेच त्यांनी तिला आत ढकलून समयसूचकता दाखविल्याचे मुंब्रा आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, वाघ यांनी सतर्कता आणि समयसुचकता दाखवून या महिलेचे प्राण वाचविल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलासह प्रवाशांनीही त्यांचे कौतुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ही महिला तिच्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत होती. मुलगी रेल्वेत शिरली. पण ही महिला रेल्वेत चढतांना रेल्वे सुटली आणि तिचा पाय सटकला. हीच बाब लक्षात आल्याने वाघ यांनी तातडीने तिला आत ढकलले. नंतर ते पुन्हा खाली उतरले. नंतर रेल्वे कळव्यात शिरल्यानंतर कळवा येथील आरपीएफ जवानाने ती सुखरुप असल्याची खातरजमा केली. वाघ यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.’’अमितकुमार यादव, पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, मुंब्रा

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेmumbraमुंब्रा