शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

पदपथाखालील गटारात पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: February 8, 2016 04:34 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील पदपथ अचानक खचल्याने त्याखालील १५ फूट खोल गटारात पडून एका महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.

ठाणे : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील पदपथ अचानक खचल्याने त्याखालील १५ फूट खोल गटारात पडून एका महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचे सासरे सईद खान यांच्या तक्रारीनंतर ठेकेदार, पालिकेचे अधिकारी, अग्निशमन अधिकारी व नगरसेवकाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राबोडी येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या जमिला अनिस खान (३५) या पती, तीन मुलांसोबत घरी जात असताना अचानक त्यांच्या पायाखालच्या पदपथाचा भाग खचल्याने त्या १५ ते २० फूट खोल गटारात कोसळल्या. त्यातील गाळात अडकल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांना बाहेर काढण्यास वेळेत मदत मिळाली नाही. तसेच घटनास्थळी उशिरा आलेल्या पोलिसांनीही कोणालाही आत जाण्यास मज्जाव केल्याने तिला वेळेत मदत मिळू शकली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. चव्हाण यांनी सांगितले.