शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधास नकार दिल्याने महिलेचे फोटो व्हायरल, अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:30 IST

प्रेमसंबंधास नकार दिल्याने केला गुन्हा : पैसेही उकळल्याची कबुली

ठाणे : प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच पैसे पुरवण्यास नकार दिल्याने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर महिलेचे फोटो व्हायरल करणाºया व्यंकटेश पेंटा (२४, रा. बोरिवली) याला अवघ्या सहा तासांमध्ये अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले. त्याला ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

कासारवडवली भागात राहणाºया २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करून नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याचाच गैरफायदा घेऊन त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करून ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरूपात देण्यास भाग पाडले. त्याच्याकडून वारंवार होणाºया शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तसेच दिवसेंदिवस त्याची पैशांचीही मागणी वाढत असल्याच्या कारणावरून या महिलेने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. त्याच्याशी प्रेमसंबंध तोडल्याने आणि पैसे पुरवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून व्यंकटेश याने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या दोघांचे काही खासगी फोटोही व्हायरल केले. फोटो व्हायरल करून त्याने बदनामी केल्याने याप्रकरणी तिने ३० जुलै २०१९ रोजी विनयभंग, खंडणी उकळणे, बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्याच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच पैशांच्या मागणीसाठी या महिलेकडे तो वारंवार संपर्क करत होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, निरीक्षक वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक विनायक निंबाळकर, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, सुजित खरात, विश्वनाथ ध्रुवे आणि मनोजकुमार पवार आदींच्या पथकाने त्याला ३१ जुलै रोजी अटक केली. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचेही उघड झाले. त्याने आणखी काही महिलांना अशाच प्रकारे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली का? आणखी कोणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल केले आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी