शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

By अजित मांडके | Updated: January 6, 2023 15:06 IST

खोदून ठेवलेल्या रस्त्याला बॅरिगेटिंग केले नसल्याने ही घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रस्ता दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात कुमोदीनी रोशन फिरके (३८) या महिला पडून किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३ येथे घडली. खोदून ठेवलेल्या रस्त्याला बॅरिगेटिंग केले नसल्याने ही घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वागळे इस्टेट, या ठिकाणी कामगार हॉस्पिटल ते इंदिरा नगर नाक्यापर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिगेटिंग करण्यात आलेली नाही. तसेच,ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुमोदीनी नामक महिला त्या रस्त्याने जात असताना खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पडल्या. 

या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच याबाबत शुक्रवारी सकाळी रोहन फिरके यांनी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिल्यावर ही घटना समोर आली. सदर तक्रारीची संबंधित विभागाने नोंद घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी. असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षमार्फत सांगण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे