शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या उपचारांसाठी 'ती' चालवते रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:15 IST

उपचारांवर लाखो रुपये खर्च; महिलेकडून मदतीचं आवाहन

ठाणे: वडील, पतीच्या निधनानंतर एकमेव आधार असलेल्या आईच्या उपचारांसाठी कल्याणमध्ये राहणारी एक महिला रिक्षा चालवते आहे. गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या आईला जगवण्यासाठी कल्याणमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय शीतल कांबळे-चव्हाण यांचा संघर्ष सुरू आहे. पहाटे ५ पासून रिक्षा, त्यानंतर पार्ट टाईम नोकरी करुन शीतल परिस्थितीशी दोन हात करत आहेत. मात्र तरीही त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी समाजाकडे मदतीचं आवाहन केलं आहे. शीतल कांबळे-चव्हाण यांच्या आई शीला कांबळे अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमनं त्रस्त आहेत. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील फिनिक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचं आतापर्यंतचं बिल साडेसहा लाख झालं आहे. रुग्णालयानं शक्य तितकी मदत केली आहे. शीतलदेखील दिवस-रात्र एक करुन मोठ्या मेहनतीनं उपचारांसाठी पैसे गोळा करत आहेत. मात्र उपचारांचा खर्च अतिशय जास्त असल्यानं त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. माय मेडिकल मंत्रा या संकेतस्थळानं शीतल यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल वृत्त दिलं आहे. जगण्यासाठी मला आईशिवाय कोणाचाही आधार नाही, अशी भावना शीतल यांनी व्यक्त केली. 'वैद्यकीय चाचणीत आईला स्वाईन फ्लू झाल्याचं निदान झालं. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र त्यानंतर तिला न्युमोनियादेखील झाला. तिच्या यकृताला आणि किडनीला सूज आली. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आईचे प्राण वाचले,' असं शीतल यांनी सांगितलं. सध्या शीतल पहाटे ५ ते दुपारी ११ रिक्षा चालवतात. त्यानंतर त्या पार्ट टाईम नोकरी करतात. मात्र त्यातून मिळणारं उत्पन्न घरखर्चावर आणि मुलीच्या शिक्षणावर खर्च होतं. त्यामुळे आईच्या उपचारांसाठी मदत करण्याचं आवाहन शीतल यांनी केलं आहे.