शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकाला रिक्षा धडकून महिलेचा जळून मृत्यू, अपघातानंतर लागली आग; रिक्षाचालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:05 IST

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता.

ठाणे - रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातानंतर रिक्षाने अचानक पेट घेतला. त्या रिक्षामध्ये अडकलेल्या महिला प्रवाशाचा  जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) हे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी पहाटे ५:४० वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलिस चौकीजवळ घडली. मृत पावलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे  कासारवडवली पोलिसांनी सांगितले. 

रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवासी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने  ठाण्याकडे महिला प्रवासी घेऊन येत होता. यादव याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्यामधील दुभाजकावर आदळली. त्यानंतर रिक्षाला अचानक आग लागली. रिक्षातील महिला प्रवासी रिक्षामध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यादव गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविली.

आगीचा भडका उडाला कसा?मृत अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ती ठाण्यात बंगळुरू येथून आलेल्या रेल्वेतून उतरल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजद्वारे उघड झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचा इतका भडका कसा उडाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.