लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नवी मुुंबईतील ऐरोली येथे झालेल्या एका गोळीबार प्रकरणातील प्रथमेश निगुडकर (२७, रा. ऐरोली) या साक्षीदारावर ठाण्यात चाकूने खूनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी अभिषेक जाधव (३८, रा. कळवा, ठाणे) याला सोमवारी अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.प्रथमेश आणि त्यांचे मित्र अमोल सोनवणे हे २४ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील सुर्वे वाडीतील गल्लीतून चहा पिऊन मोटारसायकलवरुन भांडूप येथे जात होते. त्याचवेळी साईमास हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावर साई आॅटो गॅरेजसमोर ते आले असता अभिषेक जाधव आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्या मोटारसायकली समोर मोटारसायकल लावून ‘तू आमच्या विरोधात कशी साक्ष देतोस तेच पाहतो’ असे म्हणून त्याच्याकडील चॉपरने प्रथमेश यांच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या पंज्यावर, छातीवर आणि मांडीवर वार करुन खूनाचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दतात्रय ढोले, निरीक्षक व्ही. डी. मुतडक यांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी यातील आरोपी अभिषेक जाधव याला अटक केली. तर त्याचा साथीदार मंदार गावडे याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रथमेश याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुुंबईतील गोळीबार प्रकरणातील साक्षीदारावर ठाण्यात चाकूने खूनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:26 IST
नवी मुुंबईतील ऐरोली येथे झालेल्या एका गोळीबार प्रकरणातील प्रथमेश निगुडकर (२७, रा. ऐरोली) या साक्षीदारावर ठाण्यात चाकूने खूनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडली.
नवी मुुंबईतील गोळीबार प्रकरणातील साक्षीदारावर ठाण्यात चाकूने खूनी हल्ला
ठळक मुद्दे एका हल्लेखोरास अटक वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई