शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

थर्ड पार्टी ऑडिटशिवाय ठेकेदारांना पेमेंट नाही; आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:47 IST

‘जेव्ही’ची अट विशेष कामांसाठीच

ठाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ (२) (२) अंतर्गत केलेल्या विविध कामांचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट झाल्याशिवाय ठेकेदारांना देयक अदा करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले. तसेच यापुढे सरसकट जेव्ही (जॉइंट व्हेंचर) ही अट न वापरता केवळ विशेष कामांसाठीच ती वापरावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सार्वजनिक बांधकाम विभागाने जी विविध कामे करण्यात आली आहेत, ती मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे आणि मंजूर आराखड्यानुसार केली आहेत की नाही, याची त्रयस्थ पक्षाकडून पडताळणी करूनच देयके अदा करावीत, असे त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका मुख्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. रस्त्यांच्या कामांवरून तर या विभागाची चांगलीच कानउघाडणी महासभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीतही करण्यात आली आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनीही शहरातील यूटीडब्ल्यूटीच्या रस्त्यांबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. शिवाय, शहरात झालेल्या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवरूनही आयुक्त संतापलेले होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.जॉइंट व्हेंचरच्या कामांवर मर्यादादुसरीकडे जेव्ही (जॉइंट व्हेंचर) अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा दर्जा आणि त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्र ारीच्या पार्श्वभूमीवर यापुढे सरसकट प्रत्येक निविदेमध्ये जेव्हीची अट रद्द करून ती फक्त विशेष कामांसाठीच वापरावी, असे निर्देश त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिले. शहरात अनेक ठिकाणी छोटीमोठी कामेही आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत, म्हणून हा जेव्हीचा राजकीय फंडा मागील काही वर्षांपासून महापालिकेत सुरू होता. मात्र, आता त्याला सुरुंग लावण्याचे काम महापालिका आयुक्तांनीच केल्याने जेव्हीच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून स्वत:चे चांगभलं करून पाहणाºया लोकप्रतिनिधींना त्यांनी वेसण घातल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी महापालिकेच्या वसुलीचाही आढावा घेऊन प्रत्येक विभागप्रमुखांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही केल्या.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका