शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

By धीरज परब | Updated: June 27, 2023 20:07 IST

तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ. जैन यांची भेट घेऊन भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली.

मीरारोड - मीरा भाईंदरच्या भाजपा समर्थक आमदार गीता जैन यांनी महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंत्यास थप्पड लगावल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मंगळवारी त्या अभियंत्यांनी मागे घेतली . तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर त्या अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ . जैन यांची भेट घेऊन त्यांना भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली . दोन्ही बाजूने वाद मिटल्याचे सांगण्यात आल्याने गेल्या काही दिवसां पासून गाजत असलेल्या ह्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे . 

मीरारोडच्या पेणकरपाडा येथील राजीव सिंह कुटुंबियांचे राहते घर शासन आदेशचे उल्लंघन करून पावसाळ्यात  बिल्डरच्या तक्रारी तोडल्याने आ . जैन ह्या २० जून रोजी पाहणीसाठी गेल्या होत्या . त्यावेळी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंते शुभम पाटील व संजय सोनी हे उपस्थित होते . घर तोडण्या आधी महिला , लहान मुलांना बळजबरी बाहेर खेचून काढले आदी बाबी घरातील महिला आ . जैन यांना रडून सांगत होती . तर आ . जैन ह्या त्या अभियंत्यांची कानउघाडणी करत होत्या . त्यावेळी शुभम ह्याला हसू आले म्हणून आ . जैन यांनी त्याचे शर्ट धरून त्याला थप्पड लगावली . थप्पड मारल्याचा व्हिडीओ सुद्धा सर्वत्र व्हायरल झाला .  

त्याच रात्री आ . जैन व पीडित महिलेने काशीमीरा पोलीस ठाण्यात शुभम व सोनी विरुद्ध तक्रार अर्ज दिला तर त्या दोघांनी आ . जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली . मात्र त्या नंतर फिर्याद द्यायला कोणी आले नसल्याने पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी चालवली होती . या घटने नंतर आ. जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता , मनसे सह अनेकांनी मागणी केली . तर दुसरीकडे प्रशासनातील गैर व मनमानी कारभारा मुळे आ . जैन यांचे समर्थन सुद्धा केले जात होते . 

मंगळवारी मात्र शुभम व सोनी यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात अर्ज देऊन २० जून रोजी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे पत्र दिले . पत्र दिल्या नंतर शुभम हा त्याची आई व मोठ्या भावासह आ . जैन यांच्या कार्यालयात जाऊन भेटले . त्यावेळी मोठ्या भावाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आ . जैन याना त्यांनी दिली . 

आ . जैन यांनी त्यावेळची घटना हि महिला म्हणून आलेल्या चिडीतून अचानक घडली असल्याचे सांगत होणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार होतो . आपले ह्या दोन्ही अभियंत्यांशी कधीच वाद नव्हते असे सांगत त्यांनी शुभमच्या भावाच्या लग्नाचे निमंत्रण स्वीकारले .  एका माजी नगरसेविकेच्या पतीने अभियंत्यांच्या वतीने आ . जैन यांच्या कडे मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याचे सांगितले जाते . 

टॅग्स :thaneठाणे