शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:14 IST

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

मीरा रोड : २०१७ च्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडत शिवसेनेची ताकद ही वाढलेली असून, शनिवारच्या निर्धार मेळाव्यात ती ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी ६५ जागा स्वतः आणि शिंदेसेनेला १७ जागा देण्यासह उर्वरित १३ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिला आहे. तर दुसरीकडे त्यापूर्वी शिंदेसेनेचे मंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमची युतीची इच्छा आहे; परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्याची युती करायची इच्छा नाही. पण, धोका नको म्हणून सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार असून, मुलाखती सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना २०१७ आणि आताच्या स्थितीत फरक असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळीदेखील शिवसेनेचे ८ ते १० उमेदवार हे १० ते २०० मतांनी हरले होते, असे सरनाईक म्हणाले.

ताकद दाखवून देऊ

"मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १८०० कोटींचा निधी दिला. शहरात मेट्रो प्रकल्प झाला, आपण मेट्रोखाली तीन उड्डाणपूल करून घेतले व इतर अनेक विकासकामांची माहिती त्यांनी दिली. काहींना वाटते की शिवसेनेची मीरा भाईंदरमध्ये ताकद नाही; मात्र, त्यांना दाखवून देऊ की शिवसेनेची ताकद किती आहे."- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, शिंदेसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Trouble in Mira Bhayandar? Shinde Sena Claims 50% Seats!

Web Summary : Shinde Sena demands 50% of seats in Mira Bhayandar municipal elections, citing increased strength. Pratap Sarnaik emphasizes Shiv Sena's power, rejecting BJP's proposed seat-sharing formula. Tensions rise as both parties prepare for potential independent contests.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेना