शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 12:14 IST

अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या पैशांचा योग्य विनियोगाच्या सूचना

ठाणे : राज्य शासनाकडून विविध विकासकामांसाठी मोठा निधी आलेला आहे. त्या निधीचा योग्य विनियोग करा. हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत. विकासकामांमध्ये कुचराई किंवा हलगर्जी केली तर अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिला. 

ठाण्यातील विविध ठिकाणच्या प्रकल्पांचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. शिंदे म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणच्या रस्त्यांचा कायापालट केला जात आहे. पुढील अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. तसेच ठाण्यातील रस्तेदेखील खड्डेमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ठाण्यात तलाव सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन केले जात आहे. तलावांचे शहर ही ठाणे शहराची ओळख पुसू द्यायची नाही. चांगले रस्ते, झोपडपट्टी भागातील स्वच्छ सार्वजनिक शौचालये, याकडे प्राधान्याने लक्ष द्या.   दरम्यान, रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले पाहिजे. काँक्रीटीकरणाची कामे वेळेत करा. शहराचा एंट्री पॉइंट ही शहराची ओळख असते. ठाण्याचा एंट्री पॉइंट ही शहराची ओळख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्रीनवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे.  तुमच्या ठाण्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला विकासापासून वंचित ठेवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  ठाण्याला आंतराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे काम तुमचे-आमचे आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील जबाबदारीने वागावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

क्लस्टरला लवकरच सुरुवातक्लस्टरचा विकास लवकरच केला जाईल. यासाठी सिडकोला सोबत घेतले आहे. अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरुवात करा, असे शिंदे यांनी सांगितले. संक्रमण शिबिरात राहावे लागेल, अशी नागरिकांना भीती वाटत आहे. मात्र, त्यांना संक्रमण शिबिरात न पाठवता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचे काम चांगलेठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्याकरिता शहराच्या बाहेरून वाहतूक नेण्याचे नियोजन आहे. कळवा रुग्णालयातील डॉक्टर चांगले काम करीत आहेत. परंतु, त्यांच्या हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत. त्यामुळे जे सुविधा देत नसतील, त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. लागलीच कळवा रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठातांवर कारवाई झाली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे