शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीही होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

By नितीन पंडित | Updated: March 17, 2025 13:31 IST

देवेंद्र फडणवीस सोमवारी भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

भिवंडी - या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा मंडन होईल, औरंगजेबाच्या कबरीचा महिमा मंडन होऊ देणार नाही. जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सोमवारी ते भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा,माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,आ. किसन कथोरे,आ. महेश चौघुले,दौलत दरोडा,निरंजन डावखरे,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,बालयोगी सदानंद महाराज ,श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज , कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे हे आमचे दुर्दैव आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावा लागत आहे.पण काहीही झाले तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होऊ देणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर हे सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यासाठी या स्थळाला राज्य शासनाकडून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर केंद्राकडून १२ किल्ले जागतिक वारसा यादीत यावे अशी मागणी युनोस्कोकडे करण्यात आली असून संगमेश्वरच्या वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असुन वढु, तुळापूर ,आग्रा,पाणीपत येथे प्रेरणा स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे व भिवंडी वाडा महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावावे अशी मागणी खा.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असता मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ सुचना देत या ठिकाणी सुसज्य रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या सूचना दिल्या असून भिवंडी वाडा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज