शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाच्या लिलावानंतर मिळणार गुंतवणूकदारांना पैसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:54 IST

‘गुडविन’ प्रकरण : डोंबिवलीतील एका दुकानाची आज तपासणी

सचिन सागरे कल्याण : गुडविन ज्वेलर्सचीठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये चार दुकाने आहेत. त्यापैकी केवळ डोंबिवलीतील एक दुकानच स्वत:च्या मालकीचे आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या दुकानाची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग सुकर होण्याचीही शक्यता आहे. तर, इतर भाड्याच्या दुकानांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती मूळ मालकांना परत मिळणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

‘गुडविन’चे संचालक सुनीलकुमार व सुधीशकुमार यांनी गुंतवणूकदारांना भिशी, ठेवी आणि दुप्पट पैसे देण्याचे प्रलोभन दाखवत कोट्यवधी रुपये गोळा करून पोबारा केला आहे. डोंबिवलीतील ६९ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून त्यांची तीन कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोघा बंधूंविरोधात गुन्हा नोंदवत लुकआउट नोटीस जारी केली आहे. ठाणे, डोंबिवली व अंबरनाथ येथील दुकानांची ठाणे गुन्हे आर्थिक शाखेने तपासणी केली. त्यापैकी तीन दुकानांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित डोंबिवलीतील एका दुकानाची तपासणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तपासात ज्वेलर्सच्या मालकीचे एक दुकान आढळले आहे. तपास पूर्ण होताच त्या दुकानाचा लिलाव होणार आहे. त्यानंतरच डोंबिवलीतील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.डोंबिवलीतील दोन दुकानांपैकी एक दुकान हे ज्वेलर्सच्या मालकीचे आहे. तर, दुसरे दुकान ८० हजार रुपये मासिक भाडेतत्त्वावर १५ वर्षांसाठी घेतले आहे. त्यासाठी २० लाख अनामत रक्कम भरली आहे. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुकानमालकाला न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर, पोलिसांची आणि न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालकाला त्याचा गाळा परत मिळेल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.‘कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा’लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गुडविनच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांनीही जादा टक्क्यांच्या व्याजाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कर्मचाºयांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज काही ग्राहकांनी रामनगर पोलिसांना दिला आहे. या मागणीच्या आधारे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनीही कर्मचाºयांची चौकशी व्हायला हवी, असे म्हटले आहे.मुदत ठेवीमध्ये १६ टक्के वार्षिक व्याजाचे प्रलोभन दाखवून गुंतवणूक करवून घेतल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबरला केल्याचे केणे यांनी सांगितले. ग्राहक राकेश मिश्रा, सुनील प्रसाद, किशोर महाजन, अनंत उरणकर, नरेंद्र चौधरी, श्वेता श्रुंगारपुरे या सगळ्यांनी मिळून गुडविन ज्वेलर्समध्ये एक कोटी दोन लाख ८७ हजारांची गुंतवणूक केल्याचे तक्रारीवरून उघडकीस आले आहे.ग्राहक दिवाळीदरम्यान गुडविनच्या दुकानात गेले असता तेथे त्यांना दोन दिवस दुकान बंद राहणार असल्याचे समजले. मात्र, त्यानंतर आतापर्यंत ते दुकान न उघडल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळले. त्यामुळे लाखोंची गुंतवणूक पुन्हा मिळणार की नाही, याची कोणतीच हमी नाही. त्यामुळे गुडविनचे संचालक, कर्मचारीही तेवढेच जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जादा व्याजाचे प्रलोभन दाखवणाºया चंद्रिका नायर, मुनीर अब्दुल, कोशी जॅकब, हरिदर, वेणुगोपाल नायर आदींवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. 

टॅग्स :Goodwin Jewellersगुडविन ज्वेलर्सthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी