शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

इंजीन देणार बाळ्यामामांना स्पीड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 02:02 IST

मोदींविरोधात लढाई : मनसेचे पदाधिकारी झाले सैरभैर

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपसह सर्वच पक्षांना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. या बंडखोरांना आवरण्यासाठी पक्षनेत्यांना बैठका घ्याव्या लागणार आहेत. या निवडणुकीत मनसे रिंगणात नसल्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सैरभैर झाले आहेत. त्यामुळे मनसेचे इंजीन नक्की कुणाला बळ देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे रिंगणात असताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षातून निलंबित केले. परिणामी, शिवसेनेचा एक गट युतीच्या उमेदवाराविरोधात काम करणार आहे. सुरेश म्हात्रे हे काही काळ मनसेत होते. त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याशी परिचित असलेला मनसेचा एक गट म्हात्रेंसोबत राहणार असल्याचे दिसत आहे.याचा भाजपच्या पारंपरिक मतांवर परिणाम होण्याचीही शक्यता असून, अपक्ष बाळ्यामामा म्हात्रे यांना बळ मिळण्याची शक्यता बळावली आहे.मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?२००९ साली भिवंडी लोकसभा निवडणुकीत मनसेचे देवराज के. म्हात्रे यांनी एक लाख नऊ हजार मते मिळवली होती. त्यानंतर, कल्याण विधानसभा क्षेत्रातून प्रकाश भोईर निवडून आले होते. २०१४ साली बाळ्यामामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९३ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात मनसेची एक लाखाच्या आसपास मते आहेत. यावेळी मनसे लोकसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे लाख मतांचे धनी असलेले मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत कोणाला बळ देणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी स्वत:ची वेगळी चूल मांडून भाजपविरोधात काम करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीMNSमनसे